पूर परिस्थितीसाठी मनपाला सहा बोटी
By admin | Published: June 23, 2015 02:25 AM2015-06-23T02:25:20+5:302015-06-23T02:25:20+5:30
पावासाळ्यात शहरात पूर परिस्थिती उद्भवल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने जिल्हा
आपत्ती निवारण : जिल्हा प्रशासनाची मनपाला साथ
नागपूर : पावासाळ्यात शहरात पूर परिस्थिती उद्भवल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनातर्फे महापालिकेला सहा बोटीसह विविध आवश्यक साहित्यांचा पुरवठा करण्यात आला आहे.
पावसाळ्यात शहरात ठिकठिकाणी पाणी साचते. अशा वेळी लोकांना बाहेर काढणे कठीण जाते. या पार्श्वभूमीवर सहज हाताळता येऊ शकतील, अशा सहा बोटी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे महानगरपालिकेला देण्यात आल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी मोरभवनमध्ये पाणी साचून परिसराला तलावाचे रूप आले होते. प्रवासी आपले जीव वाचवण्यासाठी बसवर चढले होते. तेव्हा याच बोटींचा वापर करण्यात आला होता. यासोबतच १ पोर्टेबल लायटिंग सिस्टिम, २ एअर मुव्हर, १० फुलफेस मास्क, ५० कार्टीज, १ काँक्रीट मेटल कर, ५ सॉरबंट्स, २ आग विझविणारे सिलेंडर, १ कॉम्बी रेस्कु टुलकीट,२ मल्टी गॅस डिटेक्टर, १० इमरजन्सी ब्रेसलेट, १५ हेड लॅम्प, ४ सर्च लाईट, १५ सेफ्टी हेलमेट आदी साहित्य प्रदान केले आहेत.(प्रतिनिधी)
बलून्स लाईट
आपत्कालीन परिस्थितीत रात्रीच्या वेळी स्वच्छ प्रकाश राहावा यासाठी पुरेसा प्रकाश देणाऱ्या लाईटची आवश्यकता भासते. यात बलून्स लाईट अतिशय चांगला प्रकाश देतात. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे असे दोन बलून्स लाईट महापालिकेला व दोन तहसील कार्यालयाला देण्यात आले आहे. विजेवर व जनरेटवरही हे लाईट चालतात. याला सुरू केल्यावर किमान १० फुट उंच बलून्स तयार होतो. त्याचा प्रकाश चारही बाजूंनी पसरतो. रात्रीच्या वेळी काम करण्यासाठी हे लाईट अतिशय उपयोगी पडतात. कळमना येथील कोल्ड स्टोअरेजची इमारत कोसळली होती तेव्हा इमारतीचा मलबा काढण्याचे काम दिवसरात्र सुरू होते. त्यावेळी याच बलून्स लाईटचा वापर करण्यात आला होता. रेल्वे अपघातांमध्ये या प्रकारच्या लाईटचा वापर केला जातो.
बॅटरीवर चालणारे
लाईट येणार
बलुन्स लाईट मोठे आणि चारही बाजूंनी प्रकाश देणारे आहेत. परंतु ते हाताळताना अतिशय कठीण जातात. सोबत जनरेटरसुद्धा ठेवावे लागते. त्यामुळे आता बाजारात बॅटरीवर चालणारे चायना मेड लाईट आले आहेत. या लाईटचा प्रकाश चांगला असतो. हे लाईट चारही बाजूंनी प्रकाश देत नसले तरी ते हाताळणे सहज व सोपे आहेत त्यामुळे लवकरच हे लाईट सुद्धा मागवण्यात येणार आहेत.