उरलेले अन्न, तेलाचे पदार्थ गडरच्या चेंबरमध्ये टाकणाऱ्यावर मनपाची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2023 10:38 PM2023-06-14T22:38:32+5:302023-06-14T22:39:19+5:30

Nagpur News मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने चेंबरमध्ये उरलेले अन्न, तेलाचे पदार्थ टाकणाऱ्या विरोधात दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.

Municipality's eye on those who throw leftover food, oil products in the gutter chamber | उरलेले अन्न, तेलाचे पदार्थ गडरच्या चेंबरमध्ये टाकणाऱ्यावर मनपाची नजर

उरलेले अन्न, तेलाचे पदार्थ गडरच्या चेंबरमध्ये टाकणाऱ्यावर मनपाची नजर

googlenewsNext

राजीव सिंह

नागपूर : गडरचे चेंबर चोक होण्याच्या सर्वाधिक तक्रारी मनपाकडे येत आहे. त्यामुळे मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने चेंबरमध्ये उरलेले अन्न, तेलाचे पदार्थ टाकणाऱ्या विरोधात दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत मनपाने शहरातील मोठ्या हॉटेलला टार्गेट केले आहे. मनपाच्या लक्षात आले की मोठ्या हॉटेलच्या परिसरातील चेंबर नेहमीच चोक असतात. त्यामुळे आता चेंबरची सफाई करण्याबरोबर दोषी हॉटेलवाल्यांना लाख रुपयांचा दंड ठोठावल्या जात आहे.

धंतोली, धरमपेठ, मंगळवारी झोन या पॉश परिसरातील चेंबर चोक करण्यात हॉटेल, रेस्टॉरंटचे कर्मचारी आहे. त्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. लक्ष्मीनगर, हनुमाननगर, सतरंजीपुरा झोनमध्ये एकही कारवाई नाही. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचाऱ्यांबरोबर एनडीएस पथकाचे कर्मचारी संयुक्त कारवाई करीत आहे. हॉटेल व रेस्टॉरेंटच्या विरोधात मोहीम चालविण्यात येत आहे. या कारवाईत दोषींवर ५ हजार रुपयांपासून ५० हजार रुपयांपर्यंत दंड वसूल केला जात आहे. कारवाई दरम्यान लक्षात आले की हॉटेलचे कर्मचारी उरलेले अन्न, तेलाचे पदार्थ, भाज्या नाल्यांच्या चेंबरमध्ये टाकतात. काही ठिकाणी रस्त्याला खोदून चेंबरला डॅमेज केले आहे. १ जानेवारी ते ३१ मे दरम्यान मनपाच्या एनडीएस पथकाने चेंबर ब्लॉक करणाऱ्या, तोडणाऱ्या, विनापरवानगी रस्ता खोदणे आदी प्रकरणात २९ लोकांवर कारवाई करून ३ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

- आता जोरात कारवाई

एनडीएस प्रमुख वीरसेन तांबे यांनी सांगितले की हॉटेल व रेस्टॉरंटजवळ चेंबर वारंवार चोकअप होत असल्याच्या तक्रारी घनकचरा विभागाकडे येत आहेत. तक्रारीनुसार चेंबर साफ करण्यात येते. मात्र त्यानंतरही दोन-चार दिवसात पुन्हा चेंबर चोक झाल्याच्या तक्रारी येते. त्यामुळे वरिष्ठांच्या निर्देशानुसार अशा परिसरात सर्चिंग करण्यात येत आहे. जिथे कुठे हॉटेल व रेस्टॉरंट दोषी आढळेल, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

 

Web Title: Municipality's eye on those who throw leftover food, oil products in the gutter chamber

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.