‘मूकनायक’ने आंबेडकरी चळवळीचा पाया रचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 11:44 AM2019-03-27T11:44:01+5:302019-03-27T11:45:25+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या पाक्षिक वृत्तपत्राने आंबेडकरी चळवळीचा पाया रचला व पुढे या चळवळीमुळे मोठे परिवर्तन घडले, असा सूर मार्गदाता पत्रिका व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशनच्या वतीने ‘मूकनायक’ शताब्दी वर्षानिमित्त आयोजित चर्चासत्रात निघाला.

'Muqnayak' laid the foundation of the Ambedkar movement | ‘मूकनायक’ने आंबेडकरी चळवळीचा पाया रचला

‘मूकनायक’ने आंबेडकरी चळवळीचा पाया रचला

Next
ठळक मुद्देवर्तमान परिस्थितीतील पत्रकारितेवरील चर्चासत्रातील सूर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या पाक्षिक वृत्तपत्राने आंबेडकरी चळवळीचा पाया रचला व पुढे या चळवळीमुळे मोठे परिवर्तन घडले, असा सूर मार्गदाता पत्रिका व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशनच्या वतीने ‘मूकनायक’ शताब्दी वर्षानिमित्त आयोजित चर्चासत्रात निघाला.
‘वर्तमान परिस्थितीत आंबेडकरी पत्रकारिता’ या विषयावरील हे चर्चासत्र लष्करीबाग येथील आंबेडकर मिशन सभागृहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मार्गदाता मासिकचे संपादक दिलेश मेश्राम होते. वक्ते म्हणून कवि लोकनाथ यशवंत, वरिष्ठ पत्रकार व लेखक अनिल वासनिक, मिलिंद फुलझेले, अ‍ॅड. हंसराज भांगे, डी.डी. वासनिक उपस्थित होते. भंते श्रद्धाशील, डॉ. आंबेडकर मिशनचे अध्यक्ष श्रीधर मेश्राम उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना कवि लोकनाथ यशवंत यांनी आंबेडकरी साहित्याचा आढावा घेतला. दलित साहित्य उपेक्षित वर्गाचा आवाज आहे. समाजातील शेवटच्या माणसाचा विचार या साहित्याने केल्याचे मत त्यांनी मांडले. आपली लढाई आपल्यालाच लढावी लागेल, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी अनिल वासनिक म्हणाले, वृत्तपत्राचा समाज परिवर्तनाचे अमोघ अस्त्र म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वापर केला. मूकनायक पासून त्यांनी सुरु केलेला पत्रप्रपंच बहिष्कृत भारत, जनता व प्रबुद्ध भारत पर्यंत वाढविला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वृत्तपत्रांनी दलित समाजाची अस्मिता जागृत करून विचार प्रवृत्त केले. त्यामुळेच सामाजिक परिवर्तनाचा लढा उभा राहिला, असे मत मिलिंद फुलझेले यांनी मांडले. दिलेश मेश्राम यांनी वृत्तपत्रांची भूमिका विषद केली. मनोहर गजभिये यांनी कविता वाचन केले. प्रास्ताविक जी. वासुदेवन यंनी केले. संचालन ए.टी. मेश्राम यांनी केले. तर बी.टी. वाहाणे यांनी आभार मानले.
यावेळी प्रवीण कांबळे, राहुल दहीकर, राजकुमार वंजारी, एन.टी. बांबोले, सी.टी. मेश्राम, प्रभाकर पानतावणे, मिलिंद गोंडाणे, वामन सोमकुवर, लहानू बन्सोड, रमेश घरडे, दिनेश खोब्रागडे अरुण गायकवाड, ओमप्रकार मोटघरे आदी उपस्थित होते.

Web Title: 'Muqnayak' laid the foundation of the Ambedkar movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.