नागपुरात  क्षुल्लक कारणावरून झालेल्या हत्या प्रकरणाचा छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 09:13 PM2020-11-09T21:13:34+5:302020-11-09T21:23:40+5:30

Murder case MIDC, crime news एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंदिरानगर परिसरात ७ नोव्हेंबरच्या रात्री झालेल्या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांनी यश मिळवले.

Murder case in Nagpur for trivial reasons detected | नागपुरात  क्षुल्लक कारणावरून झालेल्या हत्या प्रकरणाचा छडा

नागपुरात  क्षुल्लक कारणावरून झालेल्या हत्या प्रकरणाचा छडा

Next
ठळक मुद्देमृत अज्ञात, आरोपी गजाआड 

लोकमत न्यूज नेटवर्क

हिंगणा, नागपूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंदिरानगर परिसरात ७ नोव्हेंबरच्या रात्री झालेल्या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांनी यश मिळवले. शुभम ऊर्फ निंबू गजानन निंबुळकर (वय २१, रा. विजयनगर, पक्किडे ले-आउट), मंगेश भरत राय (वय २०, रा. वैशाली नगर, हिंगणा), आकाश माणिक शिंदे (वय १९, रा. रमाबाई नगर, जयताळा) अशी आरोपींची नावे आहेत. कोणताही धागादोरा नसताना आणि मृताची ओळख पटली नसतानादेखील पोलिसांनी रविवारी रात्री तीनही आरोपींना अटक केली आणि त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप झळके यांनी आज पत्रकारांना दिली. यावेळी पोलीस उपायुक्त नुरूल हसन, सहायक आयुक्त अशोक बागुल आणि तपास अधिकारी हजर होते.

पोलिसांना या हत्या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अतिरिक्त आयुक्त दिलीप झळके, उपायुक्त नुरूल हसन यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस आयुक्त अशोक बागुल ,पोलीस निरीक्षक राजेश पुकळे, सहायक पोलीस निरीक्षक रमेश हत्तीगोटे यांनी पोलिसांच्या वेगवेगळ्या टीम तयार करून मृताची तसेच आरोपींची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू केले.

रविवारी सायंकाळी पोलिसांना खबऱ्यांकडून टीप मिळाली. त्याआधारे पोलिसांनी संशयावरून शुभम ऊर्फ निंबू गजानन निंबुळकर, मंगेश भरत राय आणि आकाश माणिक शिंदे या तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार, पुढे आलेला घटनाक्रम असा आहे. मृत व्यक्तीला आरोपीही ओळखत नव्हते किंवा त्यांच्यात जुना वादही नव्हता. घटनेच्या रात्री दारूच्या नशेत रस्त्याच्या कडेला एक इसम पडून दिसला. त्यामुळे आरोपी त्याच्याजवळ गेले. त्याला उठवून उभे केले. त्यानंतर दारूच्या नशेत टुन्न असलेल्या त्या इसमासोबत (मृत) आरोपींचा वाद झाला आणि आरोपींनी त्याला खाली पाडून दगडाने ठेचले आणि पळून गेले. या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी तपास पथकाने २४ तास अहोरात्र परिश्रम घेतले. त्याचमुळे कोणताही धागादोरा नसताना आम्ही आरोपींच्या मुसक्या बांधू शकलो, असे झळके म्हणाले. अद्याप मृताची ओळख पटू शकली नाही. त्याचाही लवकरच पत्ता लावला जाईल, असे ते म्हणाले. यावेळी पोलीस उपायुक्त नुरूल हसन, सहायक पोलीस आयुक्त अशोक बागुल उपस्थित होते.

निंबूने केला घात

यातील आरोपी शुभम ऊर्फ निंबू सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात हत्या आणि अन्य गंभीर गुन्हे दाखल आहेत. राय आणि शिंदे मित्र आहेत. निंबूनेच मृताला दगडाने ठेचल्याचे आरोपी सांगत आहेत.

तपास पथकाचे कौतुक

मृताची अद्याप ओळख पटली नाही. त्याचाही लवकरच पत्ता लावला जाईल, असे यावेळी अतिरिक्त आयुक्त झळके म्हणाले. यावेळी पोलीस उपायुक्त नुरूल हसन, सहायक पोलीस आयुक्त अशोक बागुल उपस्थित होते. त्यांनी एमआयडीसीचे अधिकारी तसेच तपास पथकातील अंमलदार मंगेश गवई, आशिष दुबे, विनायक मुंडे, धर्मेंद्र यादव, बाळा साकोरे या तपास पथकाचे कौतुक केले.

Web Title: Murder case in Nagpur for trivial reasons detected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.