हत्याकांडातील फरार कैदी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 10:02 PM2018-08-28T22:02:40+5:302018-08-28T22:04:31+5:30

सात वर्षांपासून फरार असलेल्या एका कैद्याला पकडण्यात हिंगणा पोलिसांनी यश मिळवले. कमलेश मोतीराम राठोड (वय ३९) असे त्याचे नाव आहे.

Murder case Prisoner escaped from prison arrested | हत्याकांडातील फरार कैदी जेरबंद

हत्याकांडातील फरार कैदी जेरबंद

Next
ठळक मुद्देसंचित रजेवरून आल्यानंतर फरार : सात वर्षांपासून पोलिसांसोबत लपवाछपवी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सात वर्षांपासून फरार असलेल्या एका कैद्याला पकडण्यात हिंगणा पोलिसांनी यश मिळवले. कमलेश मोतीराम राठोड (वय ३९) असे त्याचे नाव आहे.
मूळचा दाभा तांडा येथील रहिवासी असलेला राठोड एका हत्या प्रकरणातील आरोपी असून, त्याला न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. २०११ मध्ये तो संचित रजेवर एक महिन्यासाठी कारागृहाबाहेर आला होता. रजा संपल्यानंतर त्याला कारागृहात परत जायचे होते. मात्र, तो फरार झाला. त्याचा इकडे तिकडे शोध घेऊनही तो आढळला नाही. त्यामुळे त्याला फरार घोषित करून त्याच्याविरुद्ध हिंगणा पोलीस ठाण्यात १९ सप्टेंबर २०१३ ला गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पोलीस त्याचा शोध घेतच होते. गेल्या काही दिवसांपासून तो खापरी पुनर्वसन परिसरातील कांबळे यांच्या घरी भाड्याने राहत असल्याचे हिंगणा पोलिसांना कळले. फरारीच्या काळात त्याने सुनिता नामक महिलेशी लग्न केले. तिला त्याच्यापासून चार वर्षांचा एक मुलगा आहे. आरोपी राठोडने स्वत:चे नाव बदलवून सचिन रामदास वरगट ठेवले होते. तो मिहानमधील एक्झावेअर टेक्नॉलॉजीत नोकरी करीत होता. सोमवारी हिंगणा पोलिसांनी अटक करून त्याला न्यायालयात हजर केले. नंतर त्याची कोठडीत रवानगी करण्यात आली. परिमंडळ एकचे उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त सिद्धार्थ शिंदे, ठाणेदार मोरेश्वर बारापात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली द्वितीय पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, उपनिरीक्षक सुनील भांडेगावकर, हवलदार विनोद कांबळे, नायक विशाल भैसारे, नीलेश वासनकर, विनोद कांबळे यांनी ही कामगिरी बजावली.

Web Title: Murder case Prisoner escaped from prison arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.