दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या

By admin | Published: March 4, 2016 02:55 AM2016-03-04T02:55:27+5:302016-03-04T02:55:27+5:30

घरासमोरच्या मैदानात आपल्या मैत्रिणीसोबत दहावीच्या पेपरची चर्चा करीत बसलेल्या एका विद्यार्थ्याला गुंडांनी बेदम मारहाण करून त्याची हत्या केली.

The murder of a Class X student | दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या

दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या

Next

गुंडांकडून बेदम मारहाण ४ तिघांना अटक ४ पोलिसांची बेफिकिरी भोवली
नागपूर : घरासमोरच्या मैदानात आपल्या मैत्रिणीसोबत दहावीच्या पेपरची चर्चा करीत बसलेल्या एका विद्यार्थ्याला गुंडांनी बेदम मारहाण करून त्याची हत्या केली. गड्डीगोदाम भागातील गौतमनगरात बुधवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाचे वातावरण आहे. रोशन राजू धोंगडे (वय १५) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी चंदू मस्ते, पीयूष घोडेस्वार आणि सोनू सावकर या तिघांना अटक केली तर मिथून मस्ते फरार आहे.
विशेष म्हणजे, कुख्यात मस्ते आणि साथीदारांची सदर पोलिसांना माहिती आहे. मात्र, हप्ताखोर पोलिसांनी त्यांच्या गुंडगिरीकडे दुर्लक्ष केल्याने ही संतापजनक घटना घडली.
रोशन मोहन नगरातील सेंट मायकल स्कूलचा दहावीचा विद्यार्थी होता. त्याच्या घरची स्थिती जेमतेम आहे. त्याचे वडील खासगी सुरक्षा रक्षक असून आई गृहिणी आहे. आरोपी चंदू आणि मिथून मस्ते गौतमनगरात कुख्यात आहे. ते दारू, जुगारात गुंतले आहेत. बुधवारी सायंकाळी रोशन आपल्या एका मैत्रिणीसोबत रेल्वेपटरीच्या मैदानाजवळ गप्पा करीत होता. त्यावेळी तेथे चंदू आणि मिथून आपल्या साथीदारांसह आले. आमच्या घरासमोर कशाला बसला असे म्हणत आरोपींनी रोशनला मारहाण केली. रोशन आणि त्याच्या मैत्रिणीने हात पाय जोडत आरोपींना सोडून देण्याची विनंती केली. मात्र, या नराधमांनी कोवळ्या रोशनच्या पोटावर, कोथ्यावर लाथाबुक्क्या मारून त्याला गंभीर जखमी केले. गंभीर अवस्थेत रोशनला मेयोत नेण्यात आले. सदर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची माहिती देण्यात आली. मात्र, मस्तेच्या जुगार अड्ड्यावरून देवघेव करणाऱ्या पोलिसांनी या प्रकरणाला दडपण्याचा प्रयत्न केला. लोकभावना तीव्र होत असल्याचे पाहून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. चंदू मस्ते, पीयूष घोडेस्वार आणि सोनू सावकर या तिघांना अटक केली तर मिथून मस्ते फरार आहे. (प्रतिनिधी)

रोशनने वडिलांना सांगितले होते
मस्ते बंधूंची गुंडगिरी आणि मस्तवालपणा गौतमनगरात सर्वांना माहीत आहे. त्यांच्या धाकामुळे कुणी बोलायला तयार नाही. या भागातील दर्गाहजवळ बसणाऱ्या प्रेमी युगुलांसोबत मस्ते आणि त्यांचे गुंड साथीदार नको ते वर्तन करतात. रोशनला यापूर्वीही त्यांनी धाक दिला होता. वडिलांना रोशनने माहिती दिली होती. वडील राजू धोंगडे यांनी ‘त्यांना आज मी समजावून सांगेन‘ असे बोलून राजू यांनी रोशनची समजूत काढली होती.

Web Title: The murder of a Class X student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.