मित्रांनीच केला मित्राचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:11 AM2021-08-27T04:11:09+5:302021-08-27T04:11:09+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क हिंगणा : चाैघे मित्र दारू पीत असताना त्यांच्यात किरकाेळ कारणावरून भांडणाला सुरुवात झाली. त्यातच तिघांनी एकावर ...

Murder of a friend by a friend | मित्रांनीच केला मित्राचा खून

मित्रांनीच केला मित्राचा खून

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

हिंगणा : चाैघे मित्र दारू पीत असताना त्यांच्यात किरकाेळ कारणावरून भांडणाला सुरुवात झाली. त्यातच तिघांनी एकावर धारदार शस्त्राने वार करीत त्याचा खून केला. तिन्ही आराेपींना अटक करण्यात पाेलिसांना यश आले आहे. ही घटना एमआयडीसी (हिंगणा) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील राजीवनगर येथील जिल्हा परिषदेच्या जुन्या शाळेच्या आवारात बुधवारी (दि. २५) रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली असून, गुरुवारी (दि. २६) सकाळी उघडकीस आली.

सुरेंद्र आनंद पीलघर (वय २६, रा. विश्वकर्मानगर, वाघधरा, ईसासनी, ता. हिंगणा) असे मृताचे तर नीलेश ऊर्फ गजनी शाह (१९), अरुण जनमत सिंह (१९), दोघेही रा. शुभमनगर, हिंगणा राेड व बबलू रामाधर सलाेडिया (२०, रा, राजीवनगर, हिंगणा राेड) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. चाैघेही मित्र असून, बांधकाम कामगार आहेत. ते नेहमीच एकत्र बसून दारू प्यायचे.

सुरेंद्र बुधवारी सायंकाळी भाजीपाला खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडला. मध्येच त्याला त्याचे अरबाज व अतुल नामक मित्र भेटले. भाजीपाला खरेदी करण्याऐवजी तिघेही दारू पिण्यासाठी जवळच्या दुकानात गेले. तिथे नीलेश, अरुण व बबलू आधीच दारू पीत बसले हाेते. दारू पिताना सुरेंद्रचा तिघांसाेबत किरकाेळ करणावरून वाद झाला.

सर्वजण आपापल्या घराच्या दिशेने निघाल्यानंतर नीलेश, अरुण व बबलूने सुरेंद्रला राजीवनगरातील जिल्हा परिषदेच्या जुन्या शाळेजवळ गाठले. तिथे तिघांनीही त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले व त्याला तिथेच जखमी अवस्थेत साेडून पळ काढला. पाेलीस उपायुक्त पखाले, सहायक पाेलीस उपायुक्त परशुराम कार्यकर्ते, ठाणेदार उमेश बेसरकर यांनी घटनास्थळाची पाहणी करून आढावा घेतला. या प्रकरणी एमआयडीसी पाेलिसांनी भादंवि ३०२, ३४ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, तपास पोलीस निरीक्षक रमेश हत्तीगोटे करीत आहेत.

....

ओळख पटताच आराेपी ताब्यात

राजीवनगरातील नागरिकांना गुरुवारी सकाळी या शाळेजवळ रक्ताच्या थाराेळ्यात पडलेला मृतदेह दिसला. त्यामुळे त्यांनी पाेलिसांना सूचना दिली. पाेलिसांनी आधी मृताची ओळख पटविण्यासाठी हालचाली सुरू केल्या. त्याची ओळख पटताच तसेच त्याला दारूचे व्यसन असल्याचे कळताच पाेलिसांनी दाेन तासांत तिघांना ताब्यात घेतले. गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना अटक केली. त्यांच्याकडून चाकू जप्त केल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Web Title: Murder of a friend by a friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.