भरधाव वेगाने बाईक चालविल्याच्या वादातून रूपेशचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 08:24 PM2021-04-28T20:24:44+5:302021-04-28T20:26:43+5:30

Murder , crime news भरधाव वेगाने बाईक चालविल्यामुळे झालेल्या वादातून रूपेश कुंभारे याचा खून करण्यात आला. पाचपावली पोलिसांनी खुनाचा मूख्य सूत्रधार असलेले दोन आरोपी गुन्हेगार आणि त्यांच्या तीन अल्पवयीन साथीदारांनाही पकडले आहे. जुन्या वैमनस्यातून हा खून झाल्याचीही परिसरात चर्चा आहे.

Murder of Rupesh over speeding bike dispute | भरधाव वेगाने बाईक चालविल्याच्या वादातून रूपेशचा खून

भरधाव वेगाने बाईक चालविल्याच्या वादातून रूपेशचा खून

Next
ठळक मुद्देगन्हेगार सूत्रधारास अटक, तीन अल्पवयीनही बंदी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भरधाव वेगाने बाईक चालविल्यामुळे झालेल्या वादातून रूपेश कुंभारे याचा खून करण्यात आला. पाचपावली पोलिसांनी खुनाचा मूख्य सूत्रधार असलेले दोन आरोपी गुन्हेगार आणि त्यांच्या तीन अल्पवयीन साथीदारांनाही पकडले आहे. जुन्या वैमनस्यातून हा खून झाल्याचीही परिसरात चर्चा आहे. गोलू ऊर्फ प्रवीण वाघमारे (२५) आणि गौरव गिरडे (२०) रा. लालगंज खैरीपुरा अशी आरोपींची नावे आहेत.

मंगळवारी रात्री बांगलादेश वस्तीतील मराठा चौक येथे २२ वर्षीय रूपेश मुरलीधर कुंभारे याची हत्या करण्यात आली होती. आठवडाभरात पाचपावली पोलीस ठाणे हद्दीतील खुनाची ही तिसरी घटना घडल्याने पोलीस विभागातही खळबळ उडाली. गोलू व गौरवने आपल्या साथीदारांच्या मदतीने रूपेशचा खून केल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला. गोलूला ८ मार्च रोजी पाचपावली पोलिसांनी शस्त्रासह पकडले होते. गौरवने ५ एप्रिल रोजी एका युवकावरही हल्ला केला होता. पोलिसांच्या रेकॉर्डवर आल्यानंतर शांत राहण्याऐवजी दोघेही आणखीनच उग्र वागत होते.

आरोपींचे म्हणणे आहे की, रूपेश मंगळवारी रात्री बाईकने मराठा चौकातून जात होतता. तो भरधाव वेगाने बाईक चालवित होता. त्यावरून त्याचा आरोपींसोबत वाद झाला. रूपेश त्यांना इंदलप्रमाणे गेम करण्याची धमकी देऊन निघून गेला. रात्री ९.३० वाजता रूपेश पुन्हा आला. त्यावेळी आरोपी काेलकाता रेल्वे लाईनजवळ बसले होते. तिथे त्यांच्यात पुन्हा वाद झाला. गोलू जवळच राहत होता. तो घरातून गुप्ती घेऊन आला. गौरवजवळ चाकू होता. दोघांनी तीन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने रूपेशवर हल्ला केला. रूपेश घराकडे पळू लागला. परंतु मराठा चौकाजवळ तो खाली पडला. त्याला रुग्णालयात नेले असता मृत घोषित करण्यात आले.

जुन्या वादातून खून झाल्याची चर्चा

आरोपी हे घटनेच्यापूर्वी वाद झाल्याचे सांगत आहेत. परंतु सूत्रानुसार, रूपेश हा पूर्वीपासूनच आरोपींना खटकत होता. पोलिस रेकॉर्डमध्ये नाव आल्यापासून दोघांनाही परिसराचा भाई म्हणवून घेण्याची महत्त्वाकांक्षा निर्माण झाली होती. हत्येनंतर परिसरात दबदबा निर्माण करून इच्छित होते. त्यासाठीच त्यांनी रूपेशची हत्या केली. रूपेश हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. वडील वाहन चालवतात. घरी आई-वडिलांसह बहीण आहे. रूपेश हा वैशालीनगरातील एका सलूनमध्ये काम करीत होता.

Web Title: Murder of Rupesh over speeding bike dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.