नागपूर जिल्ह्यातील नवरगावात पत्नीची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 11:33 PM2018-04-09T23:33:35+5:302018-04-09T23:33:50+5:30

पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरून उद्भवलेला वाद विकोपास केला आणि त्यातून चिडलेल्या पतीने रागाच्या भरात पत्नीची कुरहाडीने वार करून निर्घृण हत्या केली. ही घटना रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवरगाव (टोला) शिवारात रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली असून, आरोपी पतीस साटक (ता. पारशिवनी) परिसरात सोमवारी दुपारी अटक करण्यात आली.

The murder of wife at Navargaon in Nagpur district | नागपूर जिल्ह्यातील नवरगावात पत्नीची निर्घृण हत्या

नागपूर जिल्ह्यातील नवरगावात पत्नीची निर्घृण हत्या

Next
ठळक मुद्देकुरहाडीने केले वार : रामटेक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलआरोपी पतीला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरून उद्भवलेला वाद विकोपास केला आणि त्यातून चिडलेल्या पतीने रागाच्या भरात पत्नीची कुरहाडीने वार करून निर्घृण हत्या केली. ही घटना रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवरगाव (टोला) शिवारात रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली असून, आरोपी पतीस साटक (ता. पारशिवनी) परिसरात सोमवारी दुपारी अटक करण्यात आली.
पुष्पा महेश खंडाते (३०) असे मृत पत्नीचे नाव असून, महेश रूपचंद खंडाते (३५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. खंडाते दाम्पत्य मूळचे जुगारा (टोला), जिल्हा सिवनी (मध्य प्रदेश) येथील रहिवासी असून, ते काही वर्षांपूर्वी रामटेक तालुक्यात कामाच्या शोधात आले होते. ते कैलास ठाकरे, रा. नवरगाव यांच्या शेतातील घरात तीन महिन्यांपासून वास्तव्याला होते. शिवाय, महेश त्यांच्याकडेच शेतीची कामे करायचा. त्यांना दीड वर्षाचा मुलगादेखील आहे.
त्या दोघांमध्ये काही दिवसांपासून घरगुती कारणावरून भांडणे व्हायची. रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास त्यांच्यात जोरदार भांडण झाले. रागाच्या भरात महेशने पुष्पावर कुºहाडीने वार करून तिची हत्या केली आणि लगेच पळून गेला. पुष्पाची हत्या करण्यात आल्याची बाब महेशची आई कलाबाई हिच्या सोमवारी सकाळी लक्षात आली. तिने ही बाब कैलास ठाकरे यांना सांगितली. ठाकरे यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी रामटेक पोलिसांनी भादंवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक अनंत ठाकरे करीत आहेत.
आरोपी पतीस अटक
पुष्पाची हत्या केल्यानंतर महेश घटनास्थळाहून पळून गेला होता. पोलिसांनी घटनास्थळाहून काही साहित्यही जप्त केले. दरम्यान, पोलिसांनी महेशबाबतची माहिती पोलीस नियंत्रण कक्ष व इतर पोलीस ठाण्याला कळविली होती. तो साटक (ता. पारशिवनी) गावाच्या परिसरात फिरत असल्याची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने अटक केली. महेशच्या वडिलांचा त्याच्या बालपणीच मृत्यू झाल्याने त्याचा सांभाळ आई कलाबाईनेच केला.

Web Title: The murder of wife at Navargaon in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.