एमआयडीसीतील महिलेची हत्या संपर्कातीलच व्यक्तीकडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:09 AM2021-05-16T04:09:02+5:302021-05-16T04:09:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या विजयाबाई पांडुरंगजी तिवलकर या ६५ वर्षीय वृद्धेची हत्या तिच्या ...

Murder of a woman in MIDC by a person in contact | एमआयडीसीतील महिलेची हत्या संपर्कातीलच व्यक्तीकडून

एमआयडीसीतील महिलेची हत्या संपर्कातीलच व्यक्तीकडून

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या विजयाबाई पांडुरंगजी तिवलकर या ६५ वर्षीय वृद्धेची हत्या तिच्या संपर्कातील व्यक्तीनेच केली असावी, असा अंदाज आहे. दरम्यान, हत्या करणारे आरोपी पोलिसांना अजून सापडले नाहीत. पोलिसांची सात पथके त्यांची शोधाशोध करीत आहेत.

विजयाबाई यांची हत्या झाल्याचे शुक्रवारी दुपारी उघड झाले. हत्या करणाऱ्या आरोपींनी त्यांच्या घरातून रोख रक्कम आणि दागिने लंपास केल्याचाही संशय आहे. गेल्या ३६ तासांत पोलिसांनी दोन डझनांपेक्षा जास्त व्यक्तींची कसून चौकशी केली आहे. त्यातून पोलिसांच्या हातात काही धागेदोरे लागले आहेत. त्यावरून पुढच्या काही तासात आम्ही आरोपींना अटक करू, असा विश्वास पोलीस अधिकारी व्यक्त करीत आहेत.

--

कुलूप उघडेच होते!

या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकारी तपासात अडथळा होऊ नये म्हणून खुलेपणाने बोलायला तयार नाहीत. मात्र, विजयाताई यांचा त्यांच्या जवळच्या व्यक्तीनेच घात केला असावा, असे अनेक मुद्दे पुढे आल्याचा संबंधित सूत्रांचा दावा आहे.

विजयाबाई रोज रात्री झोपण्यापूर्वी त्यांच्या कंपाऊंडच्या गेटला आतून कुलूप लावून घ्यायच्या. मात्र, ही घटना घडल्यानंतर त्यांच्या दाराचे कुलूप उघडे होते. त्यांच्या जवळचा व्यक्ती घरी येत आहे, म्हणून विजयाबाई यांनी कुलूप उघडले असावे, आरोपी घरात आला असावा, त्याने ही हत्या करून रोख तसेच दागिने पळविले असावे आणि कुलूप न लावताच पळून गेले असावे, असा संशय आहे.

--

वह कौन थे?

विशेष म्हणजे, घटनेच्या रात्री त्या भागात एका तरुणीसह तिघे जण फिरत होते, अशी माहितीपुढे आली आहे. ते कोण होते, त्यांचाही पोलीस शोध घेत आहेत.

---

शानू हत्याकांडातील आरोपींना कोठडी

कुख्यात गुन्हेगार शानू ऊर्फ शहनावाज नासिर खान याची हत्या करणारे आरोपी सौरभ घाटे, अर्शद उर्फ राजा शेख आणि प्रवीण घाटे या तिघांना कोतवाली पोलिसांनी आज न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

---

Web Title: Murder of a woman in MIDC by a person in contact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.