दारूच्या वादातून तरुणाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:08 AM2021-07-20T04:08:11+5:302021-07-20T04:08:11+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क नरखेड : दारू पिताना दाेन गटात उद्भवलेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाल. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : दारू पिताना दाेन गटात उद्भवलेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाल. तर दाेघांपैकी एक गंभीर तर दुसरा किरकाेळ जखमी झाला. ती घटना नरखेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलाेनानजीकच्या गाेंडेगाव येथे रविवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास घडली.
रोशन शेषराव बनाईत (३१) असे मृताचे तर माधव अलोणे (३५) असे गंभीर व हिमेश बनाफर (२८) असे किरकाेळ जखमीचे नाव आहेत. तिघेही मित्र असून, बेलाेना, ता. नरखेड येथील रहिवासी आहेत. अटकेतील आराेपींमध्ये विलास कवडती, शुभम कवडती व नितेश कवडती या तिघांचा समावेश आहे. या सहाही जणांसह अन्य दाेघांना दारूचे व्यसन असल्याने तसेच नजीकच्या गाेंडेगाव येथे अवैध दारूविक्री केली जात असल्याने ते रविवारी रात्री दारू प्यायला गेले हाेते.
दारू पिताना राेशन व त्याच्या मित्रांचा विलास व त्याच्या मित्रांशी किरकाेळ कारणावरून वाद उद्भवला. हा वाद विकाेपास गेल्याने विलास, शुभम, नितेश यांच्यासह अन्य तिघांनी राेशन, माधव व हिमेशला बैलगाडीच्या उभारीने मारहाण करायला सुरुवात केली. डाेक्यावर वार केल्याने राेशनचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर माधव बेशुद्ध पडला. त्याचा मृत्यू झाल्याचे समजून त्याला साेडून दिले. किरकाेळ दुखापत झालेला हिमेश पळून गेल्याने बचावला. काही वेळाने त्या सहाही जणांनी घटनास्थळाहून पळ काढला.
पाेलिसांनी घटनास्थळ गाठून माधवला उपचारासाठी तर राेशनचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नरखेड शहरातील ग्रामीण रुग्णालयात आणले. डाॅक्टरांनी माधववर प्रथमाेपचार करून त्याला पुढील उपचारासाठी नागपूर शहरातील मेयाे रुग्णालयात भरती केले. याप्रकरणी नरखेड पाेलिसांनी हिमेशच्या तक्रारीवरून भादंवि ३०२, ३०७, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास ठाणेदार जयपालसिंग गिरासे करीत आहेत.
...
घटनेनंतर तणावाची स्थिती
नरखेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलाेना, गाेंडेगाव ही गावे संवेदनशील आहेत. मृत राेशन व जखमी माधव बेलाेना येथील रहिवासी असल्याने तसेच ही घटना गाेंडेगाव येथे घडल्याने गावात तणावाची स्थिती निर्माण झाली हाेती. हा तणाव वाढून अनुचित प्रकार घडू नये म्हणून पाेलिसांची अतिरिक्त कुमकही बाेलावण्यात आली हाेती.
...
कच्च्या दारूसाठी गाेंडेगाव प्रसिद्ध
या भागात माेहफुलाच्या दारूला कच्ची दारू नावाने ओळखले जाते. आदिवासीबहुल असलेले गाेंडेगाव परिसरात माेहफुलाच्या दारूविक्रीसाठी प्रसिद्ध आहे. गाेंडेगाव येथील दारू काढणारे व विकणारे दारूत भेसळ करीत नसल्याने परिसरातील लाेक येथे दारू प्यायला येतात, अशी माहिती दारू पिणाऱ्यांची दिली. याच अवैध दारूविक्रीतून गाेंडेगाव संवेदनशील बनले आहे.