‘मर्डरर’ तलमलेने राजकीय ‘लिंक’ असल्याचे सांगत रचले फसवणुकीचे ‘रॅकेट’

By योगेश पांडे | Published: August 7, 2023 10:51 AM2023-08-07T10:51:19+5:302023-08-07T10:53:32+5:30

राजकीय प्रभाव पाडून बेरोजगारांना करायचा ‘इम्प्रेस’ : ‘शॉर्टकट मनी’च्या नादात हुशारीचा दुरुपयोग

'Murderer' Talmley claims to have a political 'link' and creates a fraud 'racket' | ‘मर्डरर’ तलमलेने राजकीय ‘लिंक’ असल्याचे सांगत रचले फसवणुकीचे ‘रॅकेट’

‘मर्डरर’ तलमलेने राजकीय ‘लिंक’ असल्याचे सांगत रचले फसवणुकीचे ‘रॅकेट’

googlenewsNext

योगेश पांडे

नागपूर : ‘डबल मर्डर’चा सूत्रधार व १११ हून अधिक बेरोजगारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या ओंकार तलमलेची राजकीय ‘लिंक’देखील समोर आली आहे. ओंकार त्याच्या विद्यार्थिदशेपासूनच राजकीय पक्षांशी जुळला होता व त्याने त्याच्या कुकृत्यांसाठी राजकीय ओळख असल्याची बतावणी करत बेरोजगारांना जाळ्यात ओढल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ओंकार महाविद्यालयात असताना तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी असल्याचे सांगायचा. त्याने फसवणुकीचे रॅकेट सुरू केले तेव्हा तो पक्षाच्या विद्यार्थी सेनेचा जिल्हा उपाध्यक्षदेखील होता.

अवघ्या सव्वीस वर्षांच्या वयात ओंकार तलमले हा ‘डबल मर्डर’चा सूत्रधार आणि शेकडो बेरोजगारांना गंडा घालून महाठग बनला. लहानपणापासूनच ‘क्रिएटिव्ह माइंड’ असलेल्या ओंकारने ‘शॉर्टकट मनी’च्या नादात गुन्हेगारीचा मार्ग पकडला आणि त्यातूनच दोन निष्पाप व्यापाऱ्यांचा जीव गेला. ओंकार हा विद्यार्थिदशेपासूनच मनसेशी जुळला होता. तो महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा कार्यकर्ता होता व त्यानंतर त्याच्याकडे जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली असल्याचे दावे त्याने केले. तो वाडी भागात सक्रिय होता व पक्षाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये तो सहभागी व्हायचा. काही उपक्रमांत तर त्याने स्वत:चे बॅनर्सदेखील लावले होते. मोठे नेते व समाजातील मान्यवर व्यक्तींसोबतदेखील त्याचे फोटो होते. आपला राजकीय प्रभाव असल्याचे भासवत त्याने बेरोजगारांना जाळ्यात ओढले. नोकरी मिळेल या आशेत तेदेखील त्याच्या बोलण्याला फसले. राजकीय वर्तुळात असतानाच त्याची ‘डबल मर्डर’ प्रकरणातील इतर आरोपींशीदेखील ओळख झाली होती.

‘ओंकार नॉट ओन्ली ए नेम, बट ए ब्रँड’

ओंकार तलमले हा लहानपणापासूनच ‘क्रिएटिव्ह’ होता. अगदी दहावीत असतानाच त्याने सायकलच्या माध्यमातून मोबाइल चार्ज करण्याचे संशोधन केले होते. त्यानंतर अभियांत्रिकी असताना त्याने इको-फ्रेंडली कारदेखील बनविली होती. ओंकारला भारतीय नौदलात जायचे होते. मात्र राजकीय वर्तुळात प्रवेश केल्यानंतर विविध माध्यमांतून झटपट पैसे कमविता येतात, हे त्याच्या लक्षात आले. याच नादात त्याचा ‘क्रिएटिव्ह माइंड’ची दिशा ‘डिस्ट्रक्टिव्ह’ बाबींकडे गेली. ‘ओंकार नॉट ओन्ली ए नेम, बट ए ब्रँड’ अशी टॅगलाइन तो अनेकांना बोलून दाखत होता.

माटे चौकातील कार्यालयाच मुख्य अड्डा

ओंकारने राजकीय ‘लिंक’मधून आलेल्या पैशांतून माटे चौकाजवळ कार्यालय सुरू केले होते. तेथे त्याने धार्मिक असल्याची वातावरणनिर्मिती तयार केली होती. बहुतांश बेरोजगारांना त्याने तेथेच भेटायला बोलाविले. तसेच ‘डबल मर्डर’ प्रकरणातील आरोपींसोबतदेखील तो अनेकदा तेथेच भेटायचा. त्याचे कार्यालयच ‘डबल मर्डर’ व ठकबाजीचा मुख्य अड्डा झाले होते.

पक्षाचे कुठलेही पद नव्हते : गडकरी

हेमंत तलमले मनसेच्या मोठ्या नेत्यांसोबतचे फोटो दाखवून अनेकांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करायचा. याबाबत मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांना विचारणा केली असता तो वाडीतील कार्यकर्ता होता. मात्र मी सक्रिय असेपर्यंत तर पक्षाने त्याला मुख्य प्रवाहातील कुठलेही पद दिले नव्हते. विद्यार्थी सेनेत तो कितपत जुळला होता, त्याची कुठलीही कल्पना नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: 'Murderer' Talmley claims to have a political 'link' and creates a fraud 'racket'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.