मुरली मनोहर जोशींचे वक्तव्य धादांत खोटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 01:01 AM2017-09-12T01:01:50+5:302017-09-12T01:02:23+5:30

‘संस्कृत ही राष्टÑभाषा व्हावी, अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती’, असे वक्तव्य भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी रविवारी नागपुरात एका कार्यक्रमादरम्यान केले.

Murli Manohar Joshi's statement | मुरली मनोहर जोशींचे वक्तव्य धादांत खोटे

मुरली मनोहर जोशींचे वक्तव्य धादांत खोटे

Next
ठळक मुद्देडॉ. बाबासाहेबांनी कुठेच संस्कृतची इच्छा व्यक्त केली नाही : त्यांचा हिंदीवरच भर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘संस्कृत ही राष्टÑभाषा व्हावी, अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती’, असे वक्तव्य भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी रविवारी नागपुरात एका कार्यक्रमादरम्यान केले. मात्र डॉ. बाबासाहेबांनी अशी इच्छा व्यक्त केल्याचा कुठेही उल्लेख नाही, असा दावा आंबेडकरी साहित्यिक व राज्यशास्त्राच्या अभ्यासकांनी केला आहे. सध्याच्या काळात डॉ. आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख करून कुठलीही गोष्ट खपविण्याचा प्रकार सध्या सुरू असल्याची टीका या विचारवंतांनी केली आहे. लोकमतने याबाबत विचारले असता मुरली मनोहर जोशी यांचे वक्तव्य धादांत खोटे असून, त्यांचा दावा अभ्यासकांनी खोडून काढला.
आंबेडकरवाद्यांना संभ्रमात टाकण्याचे प्रयत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदी भाषेलाच राष्टÑभाषा करण्याचा आग्रह केला होता व संविधान सभेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. संपूर्ण राष्टÑाची एक भाषा त्यांना अपेक्षित होती व त्यांनी हिंदीला पसंती दिली होती. त्यांच्या ‘भाषावार प्रांतरचना’ या पुस्तकात याचे सविस्तर विश्लेषण आहे. जोपर्यंत देशात हिंदी मान्य होत नाही, तोपर्यंत इंग्रजीचा वापर करावा, अशी सूचना त्यांनी दिली होती. संस्कृत राष्टÑभाषा व्हावी, अशी इच्छा त्यांनी कुठेही व्यक्त केली नाही. मात्र सरकारच्या धोरणाला विरोध करणाºया आंबेडकरवाद्यांना संभ्रमात टाकायचे आणि हिंदूराष्टÑाचा मुद्दा रेटायचा, असे प्रयत्न या लोकांकडून केले जातात. मुरली मनोहर जोशी यांनीही तेच केले आहे. डॉ. बाबासाहेबांना विद्यार्थीदशेत संस्कृत शिकण्याची इच्छा होती. मात्र मनुवादी व्यवस्थेने ती नाकारली म्हणून पर्शीयन भाषा निवडली होती. संस्कृतची आवड म्हणून नाही तर मनुवादाचे षड्यंत्र त्यांना जाणून घ्यायचे होते. त्यामुळे बाबासाहेबांबाबत जोशी यांनी केलेला दावा पूर्णपणे खोटा आहे.
- डॉ. भाऊ लोखंडे,
ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत
ही तर जोशी यांच्या मनातील इच्छा
मुरली मनोहर जोशी धादांत खोटे बोलत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संस्कृतला विरोध नव्हता, मात्र ती राष्टÑभाषा व्हावी असे त्यांनी कधी म्हटले नाही. तसा उल्लेखही नाही. ही तर जोशी यांच्या मनातील इच्छा आहे. अलीकडे या देशात ताकदीने खोटे रेटून धरायची सवय झाली आहे. प्रधानसेवकांपासून या प्रवृत्तीला बळ मिळत आहे. डॉ. बाबासाहेबांना जमिनीचे राष्टÑीयकरण व आर्थिक घडामोडी संविधानाच्या अखत्यारित आणायच्या होत्या. देशातील आर्थिक व सामाजिक विषमता नष्ट करणे हे बाबासाहेबांचे प्राणप्रिय स्वप्न होते. सरकारला बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर याकडे लक्ष द्यावे. बाबासाहेबांनी स्वीकारलेल्या बौद्ध धम्माची मूळ पाली भाषा होती. मग संस्कृतचा विषय येतोच कुठून? त्यांच्या जीवनाचे सलग अध्ययन करणे आवश्यक आहे. मात्र एखादा मुद्दा उचलायचा आणि पेरायचा असे प्रकार सुरू आहेत. जोशी यांच्या वयाला हे शोभत नाही.
- रणजित मेश्राम,
ज्येष्ठ विचारवंत

असा उल्लेख दाखवावा
डॉ. बाबासाहेबांना संस्कृत राष्टÑभाषा करायची होती, हे सत्य नाही. त्यांना विद्यार्थी दशेत दुसºया भाषेची निवड म्हणून संस्कृत भाषा शिकण्याची इच्छा होती. मनुवादाचा बुरखा फाडण्यासाठी आणि संस्कृतमध्ये असलेले बौद्ध साहित्य जाणून घेण्यावर त्यांचा भर होता. ती राष्टÑभाषा व्हावी असे त्यांनी कधीही म्हटले नाही. त्याऐवजी त्यांनी हिंदी भाषेचा आग्रह धरला होता. संस्कृत ही प्राचीन भाषा नाही. संस्कृतपूर्वी मगधी भाषा ही लोकभाषा व राजभाषा होती. वेद उपनिषदेही छांदस या भाषेत आहेत. पाणिनीने त्यात व्याकरण जोडले व संस्कृतची निर्मिती केली. त्यामुळे ती प्राकृत भाषाही नाही कारण तिची लिपी नाही. संस्कृतला होणारा विरोध कमी करण्यासाठी डॉ. बाबासाहेबांचा उल्लेख केला जातो.
- डॉ. प्रदीप आगलावे, विभागप्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभाग
केवळ तेवढाच उल्लेख आहे
राज्यघटना तयार होत असताना एकदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबईला आले होते. त्यावेळी काही हिंदुत्ववादी लेखकांनी त्यांना भगवा ध्वज आणि संस्कृतला दर्जा देण्याची मागणी केली होती. त्यावर डॉ. बाबासाहेबांनी त्यांना उपरोधिक आश्वासन दिले होते. तेवढाच एक उल्लेख आहे. त्यांच्या एकूणच कार्याबद्दल हिंदुत्ववादी लेखकांनी चुकीचे संदर्भ दिले आहेत. त्या संदर्भांचा वापर लोक करीत असतात. अशा लेखकांचे संदर्भ यापूर्वीही आम्ही खोडून काढले आहेत. डॉ. बाबासाहेबांनी एका भाषणात देशाला एकसंघ ठेवायचे असेल तर हिंदी राष्टÑभाषा व्हावी, यावरच जोर दिला होता. संविधान सभेतही ही भूमिका मांडली होती. त्यांची हीच भूमिका अंतिम सत्य आहे.
- ताराचंद्र खांडेकर, ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत

Web Title: Murli Manohar Joshi's statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.