आसाममधील हिंसाचाराविराेधात मुस्लीम विद्यार्थ्यांची धरणे ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:09 AM2021-09-27T04:09:23+5:302021-09-27T04:09:23+5:30
आसामच्या दारंग जिल्ह्यात हिंसक कारवाईमध्ये दाेन मुस्लिमांची हत्या करण्यात आली, तर एका मृत व्यक्तीच्या शरीराची विटंबना करण्यात आली. फॅसिस्ट ...
आसामच्या दारंग जिल्ह्यात हिंसक कारवाईमध्ये दाेन मुस्लिमांची हत्या करण्यात आली, तर एका मृत व्यक्तीच्या शरीराची विटंबना करण्यात आली. फॅसिस्ट राज्यात कुठले तरी कारण पुढे करून मुस्लिमांना लक्ष्य केले जात असल्याची टीका एसआयओचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहम्मद सलमान अहमद यांनी केली. आसाममध्ये सत्ताबदल झाल्यापासून अल्पसंख्यांक समाजाला बेदखल करण्यास सुरुवात झाली आहे. दारंग जिल्ह्यात काढण्यात आलेल्या ९०० कुटुंबांना तातडीने अन्न, निवारा आणि कायदेशीर साहाय्याची गरज आहे. त्याऐवजी दहशत पसरविली जात आहे. दोन ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले. अशा क्रूर हल्ल्यात सहभागी असलेल्या पाेलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करून राज्य सरकारने लोकांना न्याय मिळेल याची खात्री करावी, अशी मागणी एसआयओने केली. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक काेटी, तर गंभीर जखमी झालेल्यांना ५० लाख रुपये भरपाई द्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.