'बाबरीच्या वेळेस बाळासाहेब नाही तर मग तुमचे काका गेले होते का?' उद्धव ठाकरेंची खोचक टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 09:08 PM2023-04-16T21:08:56+5:302023-04-16T21:09:19+5:30
'त्याचे हिंदुत्व गोमुत्रधारी हिंदुत्व आहे. गोमुत्र शिंपडता, त्यापेक्षा थोडे प्राशन करा, अक्कल येईल.'
नागपूर: आज भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरात महाविकास आघाडाची वज्रमूठ सभा पार पडली. यावेळी तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. शिवसेना(उबाठा) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी एकनाथ शिंदेंसह भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी अयोध्येचा मुद्दाही उपस्थित केला.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, 'मी पहिल्यांदा अयोध्येला गेलो होतो, तेव्हा प्रकरण कोर्टात प्रलंबित होते. पहिले मंदिर मग सरकार असं आम्ही बोललो होतो. तेव्हा पंतप्रधान मोदींना आधीच बोललो होतो की, तुमचे सरकार आहे, आपण राम मंदिर बनवूया. ते सुप्रीम कोर्टात काय व्हायचं ते होऊ द्या म्हणाले. मग आता श्रेय का घेताय? मुख्यमंत्री आता अयोध्येला गेले. ते खरे रामभक्त असते तर आधी सूरत आणि गुवाहाटीला नाही तर अयोध्येला गेले असते.
"घरात बसून कारभार करूनही पहिल्या पाचमध्ये महाराष्ट्र होता. जनतेला काय हवं?"
आताचे उपमुख्यमंत्री यापूर्वी कधीच अयोध्येला गेले नाही. पण, मुख्यमंत्री गेले म्हणून हे त्यांच्यासोबत गेले. तुझा शर्ट माझ्यापेक्षा जास्त भगवा कसा? यासाठीच हे अयोध्येला गेले. चंद्रकांत पाटील बोलले की, बाबरीच्या वेळेला बाळासाहेब नव्हते, मग तुमचे काका गेले होते का? बाबरी पाडल्यानंतर भाजपच्या गोटात पळापळ झाली होती. शिवसेना प्रमुखांनी त्यावेळी फोनवर सांगितलं होतं की, जर बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे, असंही ते म्हणाले
'आम्ही छातीवर वार करु, तुमच्यासारखा पाठीवर नाही'; नागपुरातून उद्धव ठाकरे कडाडले
मी माझ्या वडिलांचे नाव घेऊन येतो, तुम्ही तुमच्या वडिलांचे नाव घेऊन मैदानात या. आम्ही काँग्रेसबरोबर का गेलो? आम्हाल कोणी घालावलं? मी काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदूत्व सोडलं बोलतात. मला संघाला विचारायचं आहे की, नेमकं तुमचं चाललंय काय? आमचं शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही. यांचं हिंदुत्व गोमुत्रधारी हिंदुत्व आहे. गोमुत्र शिंपडता त्यापेक्षा थोडं प्राशन करा, अक्कल येईल. ते शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्व नाकारत आहेत. मोहन भागवत मशिदीत जाऊन आले. एकाबाजूला हनुमान चालीसा म्हणायची आणि मशिदीत दाऊन कव्वाली ऐकणार. हे यांचं हिंदुत्व आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.