मेरा अडोस पडोस अभिनव चित्रकला स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:06 AM2021-07-25T04:06:58+5:302021-07-25T04:06:58+5:30

स्मार्ट सिटीतर्फे लहान मुलांसाठी आयोजन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्यावतीने ...

My Ados Neighborhood Innovative Painting Competition | मेरा अडोस पडोस अभिनव चित्रकला स्पर्धा

मेरा अडोस पडोस अभिनव चित्रकला स्पर्धा

Next

स्मार्ट सिटीतर्फे लहान मुलांसाठी आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्यावतीने चिमुकल्यांसाठी ' मेरा अडोस पडोस' अभिनव चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी २ ऑगस्टपर्यंत स्मार्ट सिटीच्या गुगल फार्मच्या लिंकवर काढलेले चित्र स्कॅन करून अपलोड करावयाचे आहे.

केंद्र शासनाच्या गृह निर्माण व शहरी विकास मंत्रालयातर्फे देशातील स्मार्ट सिटीमध्ये नेबरहूड चॅलेंज हा उपक्रम राबवित येत आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमासाठी महाराष्ट्रातून एकमेव नागपूर शहराची निवड झालेली आहे.

लहान मुलांना त्यांच्या आजूबाजूला काय हवे, आपल्या परिसरात काय असायला पाहिजे, ते कसे सुरक्षित राहतील. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांच्या कल्पनेतून मिळावीत, यासाठी स्पर्धा घेतली जात आहे. मुलांमध्ये आणि पालकांमध्ये जनजागृती करणे हा मेरा अडोस पडोस स्पर्धेचा उद्देश असल्याची माहिती स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी दिली.

नेचरिंग नेबरहुड चॅलेंज अंतर्गत आयोजित या स्पर्धेत सहा वर्षापर्यंतच्या लहान मुलांना चित्रांच्या माध्यमातून त्यांच्या कल्पनेचा शेजार कसे पाहिजे, तिथे त्यांना काय हवेसे वाटते, त्यांचे काय स्वप्न आहे. याबद्दल त्यांना माझे शेजार, गल्ली किंवा खेळण्यासाठी मैदान या विषयावर चित्र काढायचे आहे. हे चित्र २ ऑगस्ट पूर्वी https://forms.gle/1LGcus5WZ1FtEXA67 या लिंकवर स्कॅन करुन अपलोड करायचे आहे. तसेच पालक आपल्या पाल्यांचे चित्र ऑफलाईन सुध्दा महापालिका छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारत, सातवा माळा, येथे स्मार्ट सिटी कार्यालयात जमा करू शकतात.

या स्पर्धेमधील प्रथम तीन विजेत्यांना प्रमाणपत्र दिले जाईल. तसेच एक प्रोत्साहन प्रमाणपत्र सुध्दा देण्यात येणार आहे, अशी माहिती स्मार्ट सिटीच्या पर्यावरण विभाग प्रमुख डॉ. प्रणिता उमरेडकर यांनी दिली.

Web Title: My Ados Neighborhood Innovative Painting Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.