मावशीशी माेबाईलवर बाेलतच लावला गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:36 AM2020-12-17T04:36:48+5:302020-12-17T04:36:48+5:30

नागपूर : आपल्या मावशीसाेबत माेबाईलवर बाेलत असतानाच एका विद्यार्थ्याने स्वत:ला गळफास लावला. सिव्हील लाइन्सस्थित महालेखाकार (एजी) क्वाॅर्टर परिसरात मंगळवारी ...

My aunt was strangled on her mobile phone | मावशीशी माेबाईलवर बाेलतच लावला गळफास

मावशीशी माेबाईलवर बाेलतच लावला गळफास

Next

नागपूर : आपल्या मावशीसाेबत माेबाईलवर बाेलत असतानाच एका विद्यार्थ्याने स्वत:ला गळफास लावला. सिव्हील लाइन्सस्थित महालेखाकार (एजी) क्वाॅर्टर परिसरात मंगळवारी दुपारी ही घटना घडली. मृताचे नाव सुजित कुमार (१८) असून ताे जहानाबाद येथील निवासी आहे. ताे महालेखाकार कार्यालयात कार्यरत असलेले काका सर्वेश कुमार यादव यांच्याकडे तीन महिन्यापासून राहत हाेता.

सुजितने नुकतीच दहावी उत्तीर्ण करून अकरावीत प्रवेश घेतला हाेता. काॅलेज बंद असल्याने ऑनलाईन अभ्यास सुरू हाेता. काका ड्यूटीवर गेल्यानंतर ताे क्वाॅर्टरमध्ये राहत हाेता. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वेश यांची पत्नी काही दिवसांपूर्वी मुलांना घेऊन गावी बिहारला गेली हाेती. त्यामुळे काका आणि पुतण्या दाेघेच क्वाॅर्टरवर राहत हाेते. सुजितने मंगळवारी दुपारी ४ वाजता बिहारमध्ये राहणाऱ्या मावशीला फाेन केला. काही वेळ संभाषण सुरू असताना अचानक सुजितचा आवाज बंद झाला. त्यामुळे मावशीने पुन्हा फाेन लावला, मात्र यावेळी कुठलाही प्रतिसाद सुजितकडून आला नाही. संशय बळावल्याने मावशीने त्वरित कार्यालयात गेलेल्या सर्वेश यांना फाेन लावून माहिती दिली. ते तात्काळ क्वॉर्टरवर पाेहचले. खिडकीतून पाहिल्यानंतर सुजित फासावर लटकलेला आढळला.

त्यांनी आरडाओरड केल्याने महालेखाकार कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी तेथे पाेहचले. त्यांनी त्वरित सदर पाेलीस स्टेशनला संपर्क केला. पाेलिसांनी सुजितचा मृतदेह खाली उतरवून रुग्णालयात पाठविला. काकाला विचारले असता मावशीसाेबत बाेलतानाच त्याने गळफास घेतल्याची बाब समाेर आली. मिळालेल्या माहितीनुसार सुजितच्या वडिलांचे काही वर्षाअगाेदर निधन झाले. एकुलता एक असलेला सुजित आईसाेबत गावी राहत हाेता. त्याने गळफास का घेतला, याबाबत खुलासा हाेऊ शकला नाही. मावशीची विचारपूस केल्यानंतरच आत्महत्येचे कारण लक्षात येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: My aunt was strangled on her mobile phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.