पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:06 AM2020-12-28T04:06:12+5:302020-12-28T04:06:12+5:30

नागपूर : नगर परिषद, नगर पंचायत, महापालिका क्षेत्राबरोबरच ग्रामपंचायतींमध्ये नागरिकांच्या सहभागातून निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर आधारित उपाययोजना करून ...

‘My Earth’ campaign to balance the environment | पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियान

पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियान

googlenewsNext

नागपूर : नगर परिषद, नगर पंचायत, महापालिका क्षेत्राबरोबरच ग्रामपंचायतींमध्ये नागरिकांच्या सहभागातून निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर आधारित उपाययोजना करून शाश्वत निसर्गपूरक जीवनपद्धत अवलंबिण्यासाठी ‘माझी वसुंधरा’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात राज्यात अव्वल क्रमांक मिळावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने कामांचे नियोजन करण्यात येत आहे. या अभियानात जिल्ह्यातील सर्व नगर परिषद, भिवापूर, हिंगणा, कुही, महादुला, मौदा व पारशिवनी या नगर पंचायत, नागपूर महानगरपालिका तसेच १० हजारावर लोकसंख्या असलेल्या काटोल तालुक्यातील कोंढाळी व नागपूर(ग्रा.)मधील खरबी या गावांची निवड करण्यात आली आहे.

पृथ्वी , वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान हे राज्यातील ६६७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २ ऑक्टोबरपासून ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानाचे मूल्यमापन होणार असून, यासाठी विविध वर्गवारीत १५०० गुण आहेत . त्यामध्ये पृथ्वी ६०० गुण, वायू १०० गुण, जल ४०० गुण, अग्नी १०० गुण, आकाश ३०० गुणांचा समावेश आहे. पृथ्वी पंचतत्त्वानुसार सामाजिक वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन नवीन हरित क्षेत्र विकास योजनेचे नियोजन करण्यात येत आहे. हवेच्या गुणवत्तेसाठी वायुप्रदूषण कमी केले जाणार आहे. जल पंचतत्त्वानुसार तलाव संवर्धन, जैवविविधतेचे जतन, जलस्रोतांचे संरक्षण व संवर्धन तलावासह सार्वजनिक विहिरीची स्वच्छता, रेनवॉटर हार्वेस्टिंग असे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. अग्नी तत्त्वानुसार ऊर्जेचा परिणामकारक वापर व बचत, अपारंपरिक ऊर्जानिर्मिती, बायोगॅस प्रकल्प, सौरऊर्जेवर एलईडी दिवे लावण्याचे नियोजन आहे. विद्युत वाहनाकरिता चार्जिंग पॉईंट निर्माण करण्यात येणार आहे. आकाश तत्त्वानुसार स्थळ आणि प्रकाश या स्वरूपात मानवी स्वभावातील बदलांसाठी जनजागृती आणि शैक्षणिक कार्यक्रमाद्वारे प्रसार केला जाणार आहे. पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.

- जागतिक पर्यावरणदिनी निकाल

स्थानिक स्वराज्य संस्थेने केलेल्या कामाचे मूल्यमापन १ एप्रिल ते ३१ मे २०२१ कालावधीत त्रयस्थ संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. त्याचा निकाल जागतिक पर्यावरणदिनी म्हणजेच ५ जून २०२१ रोजी जाहीर करून बक्षीस वितरित करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील दोन ग्रा.पं.ची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी अ‍ॅक्शन प्लॅन तयार आहे. बीडीओंनाही तेथे करावयाच्या कारवाईबाबत बैठकीतून निर्देश दिल्या गेले आहेत.

योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर

Web Title: ‘My Earth’ campaign to balance the environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.