अबब! आरटीईचे ३६४ टक्के अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 12:45 PM2019-04-01T12:45:43+5:302019-04-01T12:47:41+5:30
राईट टु एज्युकेशन (आरटीई ) अन्वये अर्ज भरण्याची प्रक्रिया ३० मार्च रोजी समाप्त झाली. राज्यात ९१९५ शाळांमध्ये ११६९६० जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. यासाठी राज्यभरातून २४८७४५ अर्ज आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राईट टु एज्युकेशन (आरटीई ) अन्वये अर्ज भरण्याची प्रक्रिया ३० मार्च रोजी समाप्त झाली. राज्यात ९१९५ शाळांमध्ये ११६९६० जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. यासाठी राज्यभरातून २४८७४५ अर्ज आले आहे. यात जागेच्या तुलनेत सर्वाधिक अर्ज नागपुरातून आले आहे.
आरटीईअतंर्गत नामांकित शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल व मागासवर्गीय जातीसाठी २५ टक्के जागा आरक्षित करण्यात येतात. नागपूर जिल्ह्यात २०१२ पासून आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. तेव्हापासून नागपूर हे आरटीईच्या बाबतीत अव्वल स्थानीच राहिले आहे. यावर्षी ५ मार्चपासून आॅनलाईन अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच नागपूर जिल्ह्याने आघाडी घेतली होती. आरटीईच्या पहिल्या वेळापत्रकात अर्ज भरण्याची अंतिम तिथी २२ मार्च ठेवण्यात आली होती. पण पालकांच्या आग्रहास्तव ३० मार्चपर्यंत मुदत करण्यात आली. त्यामुळे शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील ६७५ शाळेत ७२०४ जागांसाठी २६२६३ आॅनलाईन अर्ज दाखल झाले होते.
पुण्यामध्ये ९६३ शाळांमध्ये १६६४३ जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. त्यासाठी ५४४४३ अर्ज आले आहे.