‘माझी मेट्रो’चे गुरुवारी लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 11:03 PM2019-03-06T23:03:40+5:302019-03-06T23:04:40+5:30
महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (महामेट्रो) नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत ‘माझी मेट्रो’चे लोकार्पण गुरुवार, ७ मार्चला दुपारी ४ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून होणार आहे. वर्धा रोडवरील एअरपोर्ट साऊथ स्टेशनवर होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नवी दिल्ली येथून हिरवी झेंडी दाखविणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (महामेट्रो) नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत ‘माझी मेट्रो’चे लोकार्पण गुरुवार, ७ मार्चला दुपारी ४ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून होणार आहे. वर्धा रोडवरील एअरपोर्ट साऊथ स्टेशनवर होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नवी दिल्ली येथून हिरवी झेंडी दाखविणार आहे.
प्रमुख अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहबांधणी व नागरी कामकाज मंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीपसिंग पुरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. डॉ. विकास महात्मे, खा. कृपाल तुमाने उपस्थित राहणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी दिली आहे. प्रकल्पाला रेल्वे बोर्डाकडून सुरक्षेचे प्रमाणपत्र मिळाले आहे. उद्घाटनानंतर मेट्रो खापरी ते सीताबर्डी या १३.५ कि़मी. मार्गावर धावणार आहे.
महामेट्रो ८ मार्चला आभार दिन आभार दिन म्हणून साजरा करणार आहे. या दिवशी नागपूरकरांना मेट्रोचा नि:शुल्क प्रवास घडणार आहे. ९ मार्चला सकाळी ८ वाजेपासून सीताबर्डी ते खापरी या मार्गावर मेट्रोचा व्यावसायिक प्रवास एक महिना सवलतीचा सुरू होणार आहे. यावेळी कॉफी टेबल बुकचे प्रकाशन आणि मेट्रो फिल्म शो दाखविण्यात येणार आहे. या स्टेशनवर आयोजित प्रदर्शन नागपूरकरांसाठी सात दिवस सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत खुले राहील.