नागपुरात   ९० किमी वेगाने धावली माझी मेट्रो 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 09:53 PM2019-09-14T21:53:42+5:302019-09-14T21:54:45+5:30

आरडीएसओद्वारे सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशनदरम्यान ऑसिलेशन ट्रायल घेण्यात आली. महामेट्रोने चार हजार पोती भरून ९० किमी प्रती तासाने ट्रायल घेतली.

My Metro runs at Nagpur at a speed of 90 km | नागपुरात   ९० किमी वेगाने धावली माझी मेट्रो 

नागपुरात   ९० किमी वेगाने धावली माझी मेट्रो 

googlenewsNext
ठळक मुद्दे सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशनचा प्रवास २० मिनिटात

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : महामेट्रोच्या रिच-१ मार्गावर प्रवासी सेवा सुरू झाली असली तरी नागरिकांच्या सोयी सवलती आणि सुरक्षेच्या अनुषंगाने कार्य चालू आहेत. आरडीएसओद्वारे सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशनदरम्यान ऑसिलेशन ट्रायल घेण्यात आली. महामेट्रोने चार हजार पोती भरून ९० किमी प्रती तासाने ट्रायल घेतली.
११.५ कि.मी लांबीच्या या मार्गावर आरडीएसओचे निरीक्षण घेण्यात आले. ९७० प्रवाशांच्या वजनाइतकी म्हणजे ६३ टन रेतीची पोती रेल्वेत भरली होती. रिसर्च डिझाईन अ‍ॅण्ड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन (आरडीएसओ) यांच्या उपस्थितीत परीक्षण घेण्यात आले. गाडीत काही यंत्राच्या साहाय्याने गतीमर्यादा आणि प्रवासादरम्यान होणाऱ्या कंपनाची नोंद घेण्यात आली. आरडीएसओच्या मापदंडानुसार ही चाचणी घेण्यात आली.
सुरुवातीला पूर्णपणे रिकाम्या आणि नंतर पूर्ण वजनाने भरून ५० किमी वेगाने मेट्रो चालविण्यात आली. हळूहळू वेग वाढविण्यात आला. त्यानंतर ताशी ९० किमीपर्यंत चालविण्याची परीक्षाही मेट्रोने उत्तीर्ण केली. परीक्षणासाठी डीएमसी-ए फर्स्ट बोगी, टीसी फर्स्ट बोगी आणि डीएमसी-बी फर्स्ट बोगीवर ब्रॅकेटिंग करण्यात आले होते. तसेच गतिमापक सेन्सर आणि यावर नियंत्रण ठेवणारी प्रणाली प्रस्थापित करण्यात आली होती. आरडीएसओ पथकाने गाडीच्या विविध भागात सेन्सर्स बसवले होते. या सर्व मानकांतर्गत होणारी चाचणी सामान्य तसेच पावसाळी वातावरण निर्माण करून आरडीएसओतर्फे करण्यात आल्या. यानंतर याचा सविस्तर अहवाल तयार करून रेल्वे बोर्डाला पाठविण्यात येणार आहे.

Web Title: My Metro runs at Nagpur at a speed of 90 km

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.