देशातील पहिली वर्किंग ट्रान्सवूमन नर्स मायरा गुप्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 04:36 AM2019-04-21T04:36:59+5:302019-04-21T04:38:11+5:30
शिक्षणाने घडवली क्रांती; हैदराबादमधील मोठ्या हॉस्पिटलमध्ये सांभाळतेय जबाबदारी
- वर्षा बाशू
नागपूर : मायरा गुप्ता, भारतातील पहिली ट्रान्सवूमन वर्किंग स्टाफ नर्स. शिक्षणाने प्रगतीची महाद्वारे खुली होतात याचे अलीकडचे ताजे उदाहरण. ती सध्या हैदराबादमधील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये आॅपरेशन थिएटरमधील तांत्रिक सहकर्मी म्हणून जबाबदारी सांभाळते आहे.
मूळची नागपूरची असलेली मायरा गेल्या काही महिन्यांपूर्वी कायदेशीररीत्या मायरा आर. गुप्ता झाली आहे. त्याआधी ती विक्रम रामचंद्र गुप्ता होती. बहुतांश तृतीय पंथियांच्या वाट्याला येतात ते बरेवाईट, कडू अनुभव तिनेही पाहिले आहेत. पण मायराचा सेवाभावी स्वभाव आणि शिक्षणाची आवड यामुळे तिला एक वेगळी दिशा मिळाली. दुसरे म्हणजे तिची आई तिच्या पाठीशी भक्कमपणे उभी होती.
बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर मानसशास्त्रात बी.ए. केले. मित्रमंडळीसाठी मदतीला धावणारी अन् आजारी लोकांच्या सेवेसाठी तत्पर राहणारी मायरा साहजिकच वैद्यकीय क्षेत्राकडे वळली. आॅरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉय म्हणून कामाला लागली. तिथे एक वर्षाचा आॅपरेशन थिएटर टेक्निकल असिस्टंट हा कोर्स केला. त्यानंतर तिने बंगळुरू येथून तीन वर्षांचा नर्सिंगचा कोर्स पूर्ण केला आणि २०१८ मध्ये मायरा तेथीलच एका हॉस्पिटलमध्ये रुजू झाली. तिला अलीकडेच हैदराबाद येथील एका मोठ्या रुग्णालयात काम करण्याची संधी मिळाली आहे.
नर्सिंगचे शिक्षण घेतलेल्या एक-दोन ट्रान्सवूमन्स देशात आहेत; पण त्या नोकरी करीत नाहीत, असे मायरा सांगते. या अर्थाने ती भारतामधील पहिली वर्किंग ट्रान्सवूमन नर्स झाली आहे. नर्स बनण्याचे मायराचे एक स्वप्न तर पूर्ण झाले. तिचे दुसरे स्वप्न एका समंजस जोडीदाराचे आहे.
नर्सिंगचे शिक्षण घेतलेल्या एक-दोन ट्रान्सवूमन्स देशात आहेत; पण त्या नोकरी करीत नाहीत, असे मायरा सांगते. या अर्थाने ती भारतामधील पहिली वर्किंग ट्रान्सवूमन नर्स झाली आहे. तिने आपल्या कर्तृत्वाने इतरांसमोर नवा आदर्श ठेवला आहे.
नवा आदर्श रुढ
ट्रान्सजेंडरचे आयुष्य म्हणजे केवळ टाळ्या वाजवणे, गाणी म्हणणे एवढेच मर्यादित राहिलेले नाही, नव्या जगाच्या नव्या वाटांवरून वाटचाल करायला पाहिजे. नर्स बनण्याचे मायराचे एक स्वप्न तर पूर्ण झाले. तिचे दुसरे स्वप्न एका समंजस जोडीदाराचे आहे. मात्र, तिने तद्दन, समाज व्यवस्थेचा तिटकारा झिडकारून नवा आदर्श रूढ केला आहे.