नाग, पिवळी व पोरा नदी स्वच्छता अभियान सोमवारपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 12:30 AM2018-05-05T00:30:46+5:302018-05-05T00:31:00+5:30

शहरातील नाग नदी, पिवळी नदी, तसेच पोरा नदीमधून पावसाचे पाणी थांबणार नाही तसेच पूर परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी नद्यांच्या स्वच्छता अभियानाला येत्या ७ मे पासून सुरुवात होत असून नद्यांच्या स्वच्छता अभियानामध्ये स्वयंसेवी संस्था व उद्योजकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.

Nag, Piwali and Pora River Cleanliness campaign from Monday | नाग, पिवळी व पोरा नदी स्वच्छता अभियान सोमवारपासून

नाग, पिवळी व पोरा नदी स्वच्छता अभियान सोमवारपासून

Next
ठळक मुद्देसंसद जल व पर्यावरण रक्षण योजनेअंतर्गत मोहीम : लोकसहभाग व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : शहरातील नाग नदी, पिवळी नदी, तसेच पोरा नदीमधून पावसाचे पाणी थांबणार नाही तसेच पूर परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी नद्यांच्या स्वच्छता अभियानाला येत्या ७ मे पासून सुरुवात होत असून नद्यांच्या स्वच्छता अभियानामध्ये स्वयंसेवी संस्था व उद्योजकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.
बचतभवन येथे संसद जल व पर्यावरण रक्षण योजनेअंतर्गत नदी सफाई अभियानाची बैठक आयोजित करण्यात आली होती. याबैठकीस आमदार प्रा. अनिल सोले, मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र्र कुकरेजा, मनपा सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, अतिरिक्त महानगर पालिका आयुक्त रवींद्र्र कुंभारे, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, मुख्य अभियंता मनोज तालेवार आदी उपस्थित होते.
संसद जल व पर्यावरण रक्षण योजनेअंतर्गत शहरातील तीन प्रमुख नद्यांचे स्वच्छता अभियान मे व जून या महिन्यात राबविण्यात येत असून या अभियानासाठी विविध यंत्रणा, स्वयंसेवी संस्था तसेच उद्योजक व सीएसआर व निधीमधून या कामांना सुरुवात करण्यात येणार आहे. दरवर्षी अतिवृष्टी व पूरामुळे नद्यांचा प्रवाह बंद होत असल्यामुळे पुराची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे नद्यांची सफाई करण्यात येणार असून पावसाचे पाणी कुठेही थांबणार नाही या दृष्टीने नद्यामधील गाळ काढून खोलीकरण व रुंदीकरणाचे काम करण्यात येणार आहे. यासाठी पोकलॅण्ड व जेसीपी सारख्या यंत्राची आवश्यकता आहे. यासाठी लोकसहभाग देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
नद्यांच्या सफाई व खोलीकरणाचे काम मागील वर्षीसुध्दा करण्यात आले आहे. यामध्ये नाग नदीची लांबी १८ किलोमीटीर, पिवळी नदी १७.५ कि.मी. तर पोरा नदीची लांबी १२ कि.मी. आहे. मागील वर्षी या नद्यांमधून १ लक्ष ३३ हजार मेट्रिक टन गाळ व कचरा ४५० टिप्पर काढण्यात आले. यासाठी १० पोकलॅण्डचा वापर करण्यात आला असून यासाठी ५० हजार लिटर डिझेलचा वापर झाला आहे. यावर्षी सुध्दा १५ पोकलॅण्डची आवश्यकता असून तिन्ही नद्यातील गाळ काढणे, तसेच खोलीकरण व रुंदीकरणाचे काम करण्यात येणार आहे. हे अभियान मागील चार वर्षापासून सातत्याने राबविण्यात येत आहे.

Web Title: Nag, Piwali and Pora River Cleanliness campaign from Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.