‘नागोराव पाटणकर’ सूरसेनापतीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 01:24 AM2017-09-11T01:24:12+5:302017-09-11T01:24:38+5:30

Nagauro Patankar | ‘नागोराव पाटणकर’ सूरसेनापतीच

‘नागोराव पाटणकर’ सूरसेनापतीच

Next
ठळक मुद्देइ.मो. नारनवरे : रिपब्लिकन मुव्हमेंटतर्फे कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धम्मक्रांतीचा प्रचार, प्रसार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जनमानसात रुजविण्याचे काम त्या काळात लोककवि व गीतकारांनी केले. यात नागोराव पाटणकर यांचा मोलाचा वाटा आहे. आंबेडकरी चळवळ गतिमान करणारे ते खरे सूरसेनापती होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवि इ. मो. नारनवरे यांनी केले.
आंबेडकरी लोक गायक दिवंगत नागोराव पाटणकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी सामाजिक संघटना रिपब्लिकन मुव्हमेंटतर्फे नेताजी मार्केट येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी इ. मो. नारनवरे यांनी पाटणकर यांच्या गीतांमधून आंबेडकरी चळवळ कशी गतिमान होत गेली, हे उदाहरणांसह सांगत पाटणकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. पाटणकर यांनी धम्मप्रचारासह समाजाचे प्रश्नसुद्धा गीतांमधून मांडले. आंबेडकरी चळवळीतील गायनाच्या क्षेत्रातील ते खºया अर्थाने सूरसेनापती होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी ज्येष्ठ सामजिक कार्यकर्ते मारोतराव कांबळे, ज्येष्ठ साहित्यिक ताराचंद्र खांडेकर, भीमराव वैद्य, कवी भोला सरवर, नरेंद्र शेलार, नारायण बागडे, डॉ. विनोद डोंगरे यांनीही पाटणकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. प्रास्ताविक रिपब्लिकन मुव्हमेंटचे अध्यक्ष नरेश वाहाणे यांनी केले. संचालन सेवक लव्हात्रे यांनी केले. आजच्या सांस्कृतिक दहशतवादला खरे उत्तर
ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक ताराचंद्र खांडेकर म्हणाले, नागोराव पाटणकर हे आंबेडकरी तत्त्वज्ञान, विचार आणि आंदोलनासाठी जगले. त्यांच्या सारखा एकही लोककलावंत आज दिसत नाही. आजच्या सांस्कृतिक दहशतवादाला नागोराव पाटणकर यांची गीते आणि त्यांची शैली हे खरे उत्तर आहे.

Web Title: Nagauro Patankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.