नागनदी पुनरुज्जीवनात झोपडपट्ट्यांचा अडथळा!

By admin | Published: June 3, 2016 03:01 AM2016-06-03T03:01:35+5:302016-06-03T03:01:35+5:30

नागपूर शहराचा ऐतिहासिक वारसा असलेल्या नागनदीला गतवैभव प्राप्त व्हावे, सिवरेज व सांडपाण्यामुळे प्रदूषित झालेली ही नदी स्वच्छ व्हावी, ..

Nagnadi revival slums in the slums! | नागनदी पुनरुज्जीवनात झोपडपट्ट्यांचा अडथळा!

नागनदी पुनरुज्जीवनात झोपडपट्ट्यांचा अडथळा!

Next

पुनर्वसनाची गरज : मोकळ्या जागा व क्रीडांगणावर अतिक्रमण
गणेश हूड  नागपूर
नागपूर शहराचा ऐतिहासिक वारसा असलेल्या नागनदीला गतवैभव प्राप्त व्हावे, सिवरेज व सांडपाण्यामुळे प्रदूषित झालेली ही नदी स्वच्छ व्हावी, यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत एक हजार कोटींचा पुनरुज्जीवन प्रकल्प प्रस्तावित आहे. परंतु या नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या २९ झोपडपट्ट्यांमुळे यात अडथळा निर्माण झाला आहे.

यातील २२ झोपडपट्ट्या १९७१ ते १९९२ सालात वसलेल्या आहेत. कायद्याने या झोपडपट्ट्यांना संरक्षण प्राप्त आहे. सात झोपडपट्ट्या १९९२ सालानतंरच्या वसलेल्या आहे. त्यामुळे या झोपड्यांनाही हटविणे शक्य नाही. नागनदीचा गुजरातमधील साबरमती नदीच्या धर्तीवर विकास करण्याचे प्रस्तावित आहे. परंतु नदी किनाऱ्यावरील सार्वजनिक वापराच्या जागा, क्रीडांगण व निवासी वापरासाठी आरक्षित असलेल्या जागावर या झोपडपट्ट्या वसलेल्या आहेत.
नागनदीचे पुनरुज्जीवन करताना नदीपात्रात सोडण्यात येणारे सिवरेज, सांडपाणी सोडणे बंद करणे आवश्यक आहे. तसेच नदी पात्रात कचरा टाकण्याचा प्रकार थांबला पाहिजे. २९ झोपडट्ट्यात ९७१८ घरे असून येथील लोकसंख्या ५५२१० इतकी आहे. पुनरुज्जीवन प्रकल्प राबविताना नदीच्या दोन्ही बाजूचे पात्र मोकळे असणे आवश्यक आहे. यासाठी झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करावे लागणार आहे. परंतु झोपडपट्ट्यांची संख्या विचारात घेता हे काम अवघड आहे. नदी किनाऱ्यावर वसलेल्या झोपडपट्ट्यांना कायद्याने संरक्षण मिळाले असल्याने त्यांना उठविता येणार नाही. नदीची शहरातील लांबी १७ किलोमीटर आहे. प्रवाह शुद्ध करण्यासाठी नदीच्या दोन्ही काठावर सिवरेज लाईन टाकून त्यावर ठिकठिकाणी छोटे-छोटे मलनिस्सारण प्रकल्प उभारणे, नदीला संरक्षक भिंत, आवश्यक असलेल्या ठिकाणी रस्ते, हिरवळ व वृक्षारोपण आदी विकास कामांचा नागनदी विकास आराखड्यात समावेश आहे. यासाठी झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करून नदीपात्र व नदीकाठा लगतचा भाग मोकळा करावा लागणार आहे.

Web Title: Nagnadi revival slums in the slums!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.