नागपुरात एमएस, एमडीच्या १० जागा वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 11:32 PM2018-03-06T23:32:46+5:302018-03-06T23:33:05+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडिकल) ‘मास्टर आॅफ सर्जरी’ (एमएस) व ‘डॉक्टर आॅफ मेडिसीन’च्या (एमडी) १० जागा वाढल्या.

In Nagpur, 10 seats of MS, MD have been increased | नागपुरात एमएस, एमडीच्या १० जागा वाढल्या

नागपुरात एमएस, एमडीच्या १० जागा वाढल्या

Next
ठळक मुद्देमेडिकल : बधिरीकरण विभागाला ७ जागांचा बोनस

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडिकल) ‘मास्टर आॅफ सर्जरी’ (एमएस) व ‘डॉक्टर आॅफ मेडिसीन’च्या (एमडी) १० जागा वाढल्या. यात ‘एमएस’ची एक तर ‘एमडी’च्या नऊ जागांचा समावेश आहे. यात बधिरीकरण विभागाला सर्वाधिक म्हणजे सात जागा मिळाल्या आहेत. असे असले तरी मेडिकलला ३५ जागांची अपेक्षा होती. त्या तुलनेत २५ जागा कमी मिळाल्याचे बोलले जात आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने २०१८-१९ या वर्षात सर्व मेडिकल कॉलेजच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढविण्याचा निर्णय घेतला. भारतीय विज्ञान परिषदेने (एमसीआय) राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमधील पदव्युत्तर (पीजी) अभ्यासक्रमांच्या जागा वाढवून देण्यास तत्त्वत: मंजुरी दिली होती. यामुळे राज्यात ज्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम चालविले जातात व जिथे आवश्यक पायाभूत सोयी, मनुष्यबळ व विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत अशा सर्व महाविद्यालयांच्या दुपटीने जागा वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती. नागपूरच्या मेडिकलमध्ये पदवीच्या २०० आणि पीजी अभ्यासक्रमाच्या १६७ जागा उपलब्ध आहेत. त्यात या नव्या निर्णयामुळे मेडिकलमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या आणखी ३५ जागांची भर पडण्याची अपेक्षा होती. परंतु दहाच जागा वाढल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या जागा वाढविण्यामागे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांचे अथक परिश्रम असल्याचे सांगितले जाते.
-अशा वाढल्या जागा
बधिरीकरण विभागातील ‘एमडी’च्या सात, बालरोग विभागातील ‘एमडी’ची एक, छाती व उररोग विभागातील ‘एमडी’ची एक तर कान, नाक, घसा विभागातील ‘एमएस’ची एक अशा १० जागा वाढल्या
बधिरीकरण विभागातील पदविकाच्या जागा कायम
सुत्रानूसार, बधिरीकरण विभागाने पदविकाच्या सहा जागा कमी करून ‘एमडी’च्या २६ वाढीव जागा मागितल्या होत्या. परंतु पदविकाच्या सहा जागा कमी न करता त्या तशाच ठेवून ‘एमडी’च्या सात जागा वाढविल्या. आता या विभागाकडे सहा पदविका, एमडीच्या १४ जागा झाल्या आहेत.

Web Title: In Nagpur, 10 seats of MS, MD have been increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.