Nagpur: नागपूर विभागात तब्बल ५६ विषयांचा शंभर टक्के निकाल
By योगेश पांडे | Published: May 21, 2024 11:36 PM2024-05-21T23:36:46+5:302024-05-21T23:37:09+5:30
Nagpur HSC Result: मंगळवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालामध्ये नागपूर विभागात यंदा तब्बल ५६ विषयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. एकूण विषयांच्या तुलनेत ही टक्केवारी ४३.०७ टक्के इतकी आहे. मागील वर्षी हाच आकडा ४५ (३५.१५ टक्के) इतका होता.
- योगेश पांडे
नागपूर - मंगळवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालामध्ये नागपूर विभागात यंदा तब्बल ५६ विषयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. एकूण विषयांच्या तुलनेत ही टक्केवारी ४३.०७ टक्के इतकी आहे. मागील वर्षी हाच आकडा ४५ (३५.१५ टक्के) इतका होता. याशिवाय विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना यंदा फिजिक्स, केमेस्ट्री, बायोलॉजी या विषयांनी विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला. तसेच व्होकेशनल अभ्यासक्रमांशी संबंधित विषयांचे निकालदेखील चांगले लागले आहेत.
यंदा बारावीला एकूण १३० विषय होते. त्यातील ५६ विषयांचे निकाल १०० टक्के लागले आहेत. तर, ३० विषयांचे निकाल ९९ टक्के किंवा त्याहून अधिक लागले आहेत.
बारावीत गणित व इंग्रजीची विद्यार्थ्यांना सर्वाधिक भीती वाटत असते. कोरोनाच्या अगोदरपर्यंत गणिताचा निकाल ९० टक्क्यांच्या जवळपास राहायचा. मागील वर्षी गणिताचा निकाल ९६.७४ टक्के होता. यावर्षी त्यात किंचित वाढ झाली असून, आकडा ९६.८६ टक्क्यांवर गेला आहे. फिजिक्स (९८.८६%), बायोलॉजी (९९.४१%) व केमेस्ट्री (९९.३० %) या विषयांचा निकालदेखील मागील वर्षीपेक्षा काहीसा वाढला आहे. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना यामुळे चांगलीच मदत झाली आहे. मराठीचा निकाल ९५.२९ टक्के, तर हिंदीचा निकाल ९७.२७४४ टक्के लागला आहे. संस्कृतमध्ये ९९.५३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
इंग्रजीला सर्वाधिक तर तीन विषयांना १० च्या आत परीक्षार्थी
यंदा १३० पैकी इंग्रजी विषयाला सर्वाधिक परीक्षार्थी होते. विभागात इंग्रजीला १ लाख ६० हजार २२८ परीक्षार्थी होते. मागील वर्षीपेक्षा हा आकडा जवळपास सात हजारांनी वाढला. तर, १ लाख २ हजार ९१६ विद्यार्थी मराठीच्या परीक्षेला बसले होते. तीन विषयांना १० हून कमी परीक्षार्थी बसले होते. यात फ्रेंच (८), जर्मन (३) व जापानीज (८) यांचा समावेश होता. ३१ विषयांमध्ये ५० किंवा त्याहून कमी परीक्षार्थी होते.
मुख्य विषयांचे निकाल
विषय : टक्केवारी (२०२२) : टक्केवारी (२०२३) : टक्केवारी (२०२४)
इंग्रजी : ९६.७९ : ९२.७० : ९३.२८
गणित : ९९.६० : ९६.७४ : ९६.८६
फिजिक्स : ९९.६७ : ९८.१७ : ९८.८६
बायोलॉजी : ९९.७० : ९८.४७ : ९९.३०
केमेस्ट्री : ९९.७० : ९८.४९ : ९९.४१
मराठी : ९७.९६ : ९३.३९ : ९५.२९
हिंदी : ९९.१५ : ९७.४७ : ९७.४४
संस्कृत : १०० : ९९.६० : ९९.५३
शंभर टक्के निकाल लागलेले विषय
- फ्रेंच
- जापानीज्
- जर्मन
- जिऑलॉजी
- फिलॉसॉफी
- ड्रॉइंग
- हिस्ट्री ऑफ आर्ट्स
- व्होकेशनल क्लासिकल म्युझिक
- मॅथेमॅटिक्स- स्टॅटिस्टिक्स (कॉमर्स)
- कृषी विज्ञान
- इलेक्ट्रिकल मेन्टेनन्स
- मेकॅनिलक मेन्टेनन्स
- जनरल सिव्हिल इंजिनीअरिंग
- ऑफिस मॅनेजमेंट
- स्मॉल इंडस्ट्रीज ॲण्ड सेल्फ एम्प्लॉयमेन्ट
- क्रॉप सायन्स
- हॉर्टिकल्चर
- फ्रेश वॉटर फिश कल्चर
- इलेक्ट्रॉनिक्स फिल्ड टेक्नॉलॉजी
- ब्युटी थेरपिस्ट
- स्पोर्ट्स फिटनेस ट्रेनर
- ॲग्रीकल्चर मायक्रो इरिगेशन टेक्नॉलॉजी
- टुरिझम हॉस्पिटॅलिटी
- आयटीआय-६
- मेकॅनिकल टेक्नॉलॉजी - १
- मेकॅनिकल टेक्नॉलॉजी-२
- मेकॅनिकल टेक्नॉलॉजी-३
- हॉर्टिकल्चर- १
- हॉर्टिकल्चर- २
- ॲनिमल हस्बंडरी ॲण्ड डेअरी – १
- ॲनिमल हस्बंडरी ॲण्ड डेअरी – २
- ॲनिमल हस्बंडरी ॲण्ड डेअरी – ३
- फिशरीज टेक्नॉलॉजी - १
- फिशरीज टेक्नॉलॉजी – २
- फिशरीज टेक्नॉलॉजी – ३
- मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी - १
- मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी – २
- मेडिकल लेबॉरेटरी टेक्नॉलॉजी - ३
- रेडिओलॉजी टेक्निशिअन-१
- रेडिओलॉजी टेक्निशिअन-२
- रेडिओलॉजी टेक्निशिअन-३
- चाइल्ड ओल्ड एज केअर-१
- चाइल्ड ओल्ड एज केअर-२
- चाइल्ड ओल्ड एज केअर-३
- ऑप्थॅल्मिक टेक्निशिअन-१
- ऑप्थॅल्मिक टेक्निशिअन-२
- ऑप्थॅल्मिक टेक्निशिअन-३
- फूड प्रोडक्ट्स टेक्नॉलॉजी-१
- फूड प्रोडक्ट्स टेक्नॉलॉजी-२
- फूड प्रोडक्ट्स टेक्नॉलॉजी-३
- टुरिझम ॲण्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट-१
- टुरिझम ॲण्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट-२
- टुरिझम ॲण्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट-३
- मार्केटिंग ॲण्ड रिटेल मॅनेजमेन्ट – १
- मार्केटिंग ॲण्ड रिटेल मॅनेजमेन्ट – २
- मार्केटिंग ॲण्ड रिटेल मॅनेजमेन्ट - ३