नागपुरात दोन दिवसात १२ रुग्ण पॉझिटिव्ह : रुग्णांची संख्या १५०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 09:47 PM2020-05-02T21:47:30+5:302020-05-02T21:48:30+5:30

दोन दिवसात १२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. शुक्रवारी सहा तर आज शनिवारी आणखी सहा रुग्णांची नोंद झाली. या रुग्णांसह नागपुरात एकूण रुग्णांची संख्या १५० वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, १४ महिन्यांच्या जुळ्या बाळापैकी एका बाळाचे नमुने पॉझिटिव्ह आले.

In Nagpur, 12 patients tested positive in two days: 150 patients | नागपुरात दोन दिवसात १२ रुग्ण पॉझिटिव्ह : रुग्णांची संख्या १५०

नागपुरात दोन दिवसात १२ रुग्ण पॉझिटिव्ह : रुग्णांची संख्या १५०

Next
ठळक मुद्देतीन रुग्णांची कारोनावर मात

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : दोन दिवसात १२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. शुक्रवारी सहा तर आज शनिवारी आणखी सहा रुग्णांची नोंद झाली. या रुग्णांसह नागपुरात एकूण रुग्णांची संख्या १५० वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, १४ महिन्यांच्या जुळ्या बाळापैकी एका बाळाचे नमुने पॉझिटिव्ह आले. नागपुरात पहिल्यांदाच एवढ्या कमी वयाच्या बाळाला कोरोनाची नोंद झाली. त्याची आईसुद्धा पॉझिटिव्ह आहे.

अमरावती वरुड येथून मेडिकलमध्ये उपचारासाठी आलेली ४५ वर्षीय महिला रुग्णाचा नमुना शुक्रवारी पॉझिटिव्ह आला. या महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या रुग्णासह ‘एम्स’ प्रयोगशाळेत चार व नीरीच्या प्रयोगशाळेत एक असे पाच रुग्णाचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. या पाचही महिला असून सतरंजीपुरा येथील रहिवासी आहेत. शनिवारी ‘एम्स’च्या प्रयोगशाळेने ६२ नमुने तपासले असता यातील सहा नमुने पॉझिटिव्ह आले. यात सतरंजीपुरा येथील ९, १९, २८, २५ वर्षीय महिला व १४ महिन्याची मुलगी आहे. तर ४८ वर्षीय महिला मोमिनपुरा येथील रहिवासी आहे. या दोन दिवसांत १२ रुग्णांची नोंद झाली असून रुग्णांची संख्या १५०वर पोहचली आहे.

जुळ्यांपैकी एक पॉझिटिव्ह, दुसरे निगेटिव्ह

सतरंजीपुरा येथील रहिवासी २५ वर्षीय महिला आणि तिचे १४ महिन्याचे बाळ एम्सच्या प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वात कमी वयाचे बाळ म्हणून त्याची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, या महिलेला जुळ्या मुली आहेत. यातील एक बाळ पॉझिटिव्ह तर दुसºया बाळाचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. ‘व्हीएनआयटी’ येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये यांना ठेवण्यात आले होते. एक दिवसापूर्वी त्यांचे नमुने ‘एम्स’ला पाठविण्यात आले असताना आज आई आणि एका बाळाचा अहवाल पॉझिटिव्ह तर दुसºया बाळाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. पर्याय नसल्याने निगेटिव्ह आलेले बाळही आईसोबत मेयोमध्ये उपचार घेत आहे. यांच्या वडिलांनाही क्वारंटाईन करण्यात आले होते, असे अधिकारी सांगतात; परंतु ते कुठे आहेत, याचे उत्तर कुणाकडेच नव्हते.

नागपुरात ४६ कोरोनामुक्त

शांतीनगर येथील २८ वर्षीय महिलेचा व कामठी रोड येथील ३३ वर्षीय पुरुषाचा नमुना १९ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला होता. दोघांनाही मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. १४ दिवसानंतर २४ तासांच्या अंतराने तपासण्यात आलेले दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने दोघांनाही शुक्रवारी मेडिकलमधून सुटी देण्यात आली. तर १३ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आलेल्या सतरंजीपुरा येथील १९ वर्षीय युवकाचा नमुना निगेटिव्ह आल्याने त्याला मेयोमधून सुटी देण्यात आली. शुक्रवारी तीन रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने नागपुरात बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४६ झाली आहे.

कोरोनाची आजची स्थिती

दैनिक संशयित १८३
दैनिक तपासणी नमुने ३०१

दैनिक निगेटिव्ह नमुने २९४
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने १५०

नागपुरातील मृत्यू ०२
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ४६

डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण १,४६३
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित १,८४१

-पीडित-१५०-दुरुस्त-४६_-मृत्यू-२

 

Web Title: In Nagpur, 12 patients tested positive in two days: 150 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.