CoronaVirus in Nagpur : नागपुरात दुसऱ्या दिवशीही १२७० पॉझिटिव्ह, ४५ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 12:21 AM2020-08-28T00:21:37+5:302020-08-28T00:23:48+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. सलग तिसऱ्या दिवशी रोजच्या रुग्णसंख्येत हजार रुग्णांनी वाढ झाली आहे. आश्चर्यकारक म्हणजे, बुधवारी जेवढ्या रुग्ण व मृत्यूची भर पडली तेवढ्याच रुग्ण व मृत्यूच्या संख्येची गुरुवारी नोंद झाली. आज १२७० रुग्ण पॉझिटिव्ह तर ४५ रुग्णांचा जीव गेला.

In Nagpur, 1270 positive, 45 deaths on the second day | CoronaVirus in Nagpur : नागपुरात दुसऱ्या दिवशीही १२७० पॉझिटिव्ह, ४५ मृत्यू

CoronaVirus in Nagpur : नागपुरात दुसऱ्या दिवशीही १२७० पॉझिटिव्ह, ४५ मृत्यू

Next
ठळक मुद्देशहरात १००४ तर ग्रामीणमध्ये २६४ बाधितांची नोंद

लोकमत न्यूज नेटवक
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. सलग तिसऱ्या दिवशी रोजच्या रुग्णसंख्येत हजार रुग्णांनी वाढ झाली आहे. आश्चर्यकारक म्हणजे, बुधवारी जेवढ्या रुग्ण व मृत्यूची भर पडली तेवढ्याच रुग्ण व मृत्यूच्या संख्येची गुरुवारी नोंद झाली. आज १२७० रुग्ण पॉझिटिव्ह तर ४५ रुग्णांचा जीव गेला. नागपूर जिल्ह्यातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी वाढ आहे. रुग्णांची एकूण संख्या २४,७६५ झाली असून, मृतांची संख्या ९०४ वर पोहचली आहे. रुग्णसंख्या वाढत असताना बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही हजारावर जात आहे. याचे प्रमाण रुग्णसंख्येचा तुलनेत ५९ टक्केआहे.
कोरोनाच्या पाच महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात भयावह आकडेवारी समोर आली आहे. या महिन्याच्या शेवटपर्यंत आकडेवारी कमी कमी होत जाईल, असा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज होता. परंतु शेवटच्या आठवड्यातच रुग्णसंख्येत नवे विक्रम स्थापित होत असल्याचे दिसून येत आहे. यात मृत्यूच्या आकड्याने आरोग्य यंत्रणेची झोप उडविली आहे. इंदिरा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) आज नऊ रुग्णांचा मृत्यू झाला, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (मेडिकल) १४ रुग्णांचे बळी गेले. यात विठ्ठलनगर हुडकेश्वर येथील ५४ वर्षीय पुरुष, चंद्रपूर येथील ३४ वर्षीय महिला, हिवरीनगर येथील ७५ वर्षीय पुरुष, २१ वर्षीय युवती, ६९ वर्षीय महिला, अंबानगर मानेवाडा येथील ६० वर्षीय पुरुष, गरोबा मैदान येथील ७७ वर्षीय महिला, इमामवाडा येथील एक रुग्ण, नारी रोड येथील ७५ वर्षीय रुग्ण, लालगंज मेहंदीबाग येथील ४५ वर्षीय पुरुष, विश्रामनगर छत्रपती चौक येथील ७५ वर्षीय महिला, २७ वर्षीय तरुण, ४० वर्षीय पुरुष व भंडारा येथील ५२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. उर्वरित मृतांची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

४,४१४ अ‍ॅन्टिजन चाचणीतून ५३७ पॉझिटिव्ह
ग्रामीण भागात १६२५ तर शहरात २,७८९ असे एकूण ४,४१४रॅपिड अ‍ॅन्टिजन चाचण्या झाल्या. यात ५३७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. एकूण चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण १२.१६ टक्के होते. याशिवाय ग्रामीण भागातील ३२९ तर शहरातील २,१५२ अशा एकूण २,४८१ रुग्णांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. यात ७३३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात एम्समधून ५५, मेडिकलमधून ११८, मेयोमधून १३३, नीरीमधून ९४ तर खासगी लॅबमधून ३३३ रुग्णांची नोंद झाली.

शहरातील १८,९६८ तर ग्रामीणमधील ५,५२५ रुग्ण बाधित
आज शहरात १००४, ग्रामीणमध्ये २६४ तर जिल्ह्याबाहेरील दोन रुग्णांची नोंद झाली. शहरात रुग्णांची एकूण संख्या १८,९६८, ग्रामीणमध्ये ५,५२५ तर जिल्ह्याबाहेरील २७२ आहेत. दिवसभरात शहरात ३३, ग्रामीणमध्ये १० तर जिल्ह्याबाहेरील दोन रुग्णाचा मृत्यू झाला. एकूण मृतांमध्ये शहरात ६८१, ग्रामीणमध्ये १३३ तर जिल्ह्याबाहेरील ९० मृत्यू आहेत. आज १०५४ रुग्ण बरे झाले. यात शहरातील ८३४ तर ग्रामीणमधील २२० रुग्ण आहेत. आतापर्यंत शहरातील १०,५८६ तर ग्रामीण भागातील ४,१७७ असे एकूण १४,७६३ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या शहरातील ७,०३६ तर ग्रामीणमधील २,०६२ असे एकूण ९,०९८ रुग्ण उपचार घेत आहेत.

दैनिक संशयित : ६,८९५
बाधित रुग्ण : २४,७६५
बरे झालेले : १४,७६३
उपचार घेत असलेले रुग्ण : ९,०९८
मृत्यू : ९०४

शहर व ग्रामीणमध्ये कोरोनाची स्थिती
आजचे रुग्ण शहरात १००४
ग्रामीणमध्ये २६४
एकूण रुग्ण शहरात १८,९६८
ग्रामीणमध्ये ५,५२५
आज मृत्यू शहरात ३३
ग्रामीणमध्ये १०
एकूण मृत्यू शहरात ६८१
ग्रामीणमध्ये १३३
आज बरे झालेले रुग्ण शहरातील ८३४
ग्रामीणमधील २२०
एकूण बरे झालेले रुग्ण शहरात १०,५८६
ग्रामीणमधील ४,१७७

अयोध्यानगर पोस्ट ऑफीसमध्ये ११ पॉझिटिव्ह
अयोध्यानगर पोस्ट ऑफिसमधील ११ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. गुरुवारी १० कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर एका कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट बुधवारीच आला होता. पोस्ट ऑफिस एक दिवसासाठी बंद ठेवण्यात आले आहे.
अयोध्यानगर येथील पोस्ट ऑफिसमध्ये एकूण २५ कर्मचारी कार्यरत आहेत. शुक्रवारी पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. २८ ऑगस्टनंतर पोस्ट ऑफिस उघडण्याबाबत निर्णय घेतला जाईल. यापूर्वी सुद्धा जीपीओमधील चार कर्मचारी पॉझिटिव्ह आले होते.

Web Title: In Nagpur, 1270 positive, 45 deaths on the second day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.