नागपुरात १४ हजार मद्यपी चालकांची उतरवली झिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 10:17 PM2018-09-06T22:17:40+5:302018-09-06T22:20:06+5:30

दारू प्यायल्यामुळे रस्त्यावरील अपघात वाढतात. क्षुल्लक कारणाचे पर्यवसान दंगलीत होते. यावर आळा घालण्यासाठी शहरात विविध मार्गावर ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ची कारवाई केली जाते. दोषी वाहनचालकांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन प्रकरण न्यायालयात दाखल होते, असे असतानाही ही प्रकरणे कमी होताना दिसून येत नाही. गेल्या वर्षी २७ हजार प्रकरणांची नोंद झाली. तर यावर्षी जानेवारी ते आॅगस्ट या महिन्यात १४ हजार १७ मद्यपी चालकांवर कारवाई करीत त्यांची झिंग उतरवली.

In Nagpur, 14 thousand alcoholic drivers were penalised | नागपुरात १४ हजार मद्यपी चालकांची उतरवली झिंग

नागपुरात १४ हजार मद्यपी चालकांची उतरवली झिंग

Next
ठळक मुद्देआठ महिन्यातील कारवाई : गेल्या वर्षी ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’मध्ये २७ हजार प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : दारू प्यायल्यामुळे रस्त्यावरील अपघात वाढतात. क्षुल्लक कारणाचे पर्यवसान दंगलीत होते. यावर आळा घालण्यासाठी शहरात विविध मार्गावर ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ची कारवाई केली जाते. दोषी वाहनचालकांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन प्रकरण न्यायालयात दाखल होते, असे असतानाही ही प्रकरणे कमी होताना दिसून येत नाही. गेल्या वर्षी २७ हजार प्रकरणांची नोंद झाली. तर यावर्षी जानेवारी ते आॅगस्ट या महिन्यात १४ हजार १७ मद्यपी चालकांवर कारवाई करीत त्यांची झिंग उतरवली.
वाढत्या शहरीकरणामुळे शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. यात मद्यपी चालकांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढतच चालले आहे. याला आळा बसावा यासाठी शहरातील प्रमुख मार्गांवर बॅरिकेट्स लावून ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ची विशेष मोहीम राबवली जाते. विशेषत: ही मोहीम सायंकाळी ७ वाजतानंतरच सुरू होते. पोलीस उपायुक्त (वाहतूक) राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनात या मोहिमेत एकट्या आॅगस्ट महिन्यात १२०३ दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. परंतु या वर्षातील ही सर्वात कमी कारवाई असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येते.

मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांची संख्या वाढतेय
चालकांच्यामुळे होणारे अपघात हे टाळता येऊ शकणारे आहेत. परंतु मद्यपान करून वाहन चालविणे हा गुन्हा आहे, हे माहीत असतानाही वाहनचालक या नियमाची पायमल्ली करताना दिसून येतात. वाहतूक विभागाच्या ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्रॉईव्ह’ या मोहिमेत जानेवारी महिन्यात १७११, फेब्रुवारीमध्ये २२१९, मार्चमध्ये १६२८, एप्रिलमध्ये १६८६, मेमध्ये १३५२, जूनमध्ये १८३७, जुलैमध्ये २३८१ तर आॅगस्ट १२०३ वाहनांवर झालेली कारवाई हे बोलके उदाहरण आहे.

या चौकांमध्ये सर्वाधिक कारवाई
शहरात बहुसंख्य मार्गावर ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ची कारवाई होते. गेल्या काही आठवड्यांपासून महाराजबाग रोडवर या कारवाईला व्यापक स्वरूप देण्यात आले. रोजचा मार्ग असलेल्या वाहन चालकांसाठी ही कारवाई डोकेदुखी ठरली होती. परंतु आता पोलीस आणि अशा वाहनचालकांची ओळख पटल्याने पोलिसांचा समजूतदारपणा दिसून येत आहे. शहरात या मार्गासोबतच तुकडोजी पुतळा, टीबी वॉर्ड,भांडे प्लॉट चौक, कमाल टॉकीज चौक, राणी दुर्गावतीनगर चौक, जरीपटका चौक, गिट्टीखदान चौक, प्रतापनगर चौक, टाकळी सीम, भगवानगर रोडवर नेहमी कारवाई होताना दिसून येते.

Web Title: In Nagpur, 14 thousand alcoholic drivers were penalised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.