नागपूर @ ४३.४; विदर्भातील दुसऱ्या क्रमांकाचे गरम शहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 09:39 AM2020-04-18T09:39:58+5:302020-04-18T09:40:44+5:30
विदर्भात सर्वात जास्त गरम शहरात नागपूरचा दुसरा क्रमांक होता. अकोला येथे ४३.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एप्रिल महिन्याचा दुसरा पंधरवडा सुरू होताच उन्हाच्या झळा जाणवायला लागल्या आहेत. शुक्रवारी नागपुरात कमाल ४३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भात सर्वात जास्त गरम शहरात नागपूरचा दुसरा क्रमांक होता. अकोला येथे ४३.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले.
नागपुरात २४ तासात कमाल तापमानामध्ये १.८ अंश सेल्सिअसची वाढ झाली. शुक्रवारचे कमाल तापमान सरासरीहून तीन अंश सेल्सिअस अधिक होते. सकाळी ८.३० वाजता आर्द्रता ५१ टक्के होती तर सायंकाळी ५.३० वाजता हेच प्रमाण २१ टक्के इतके होते.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवस पारा आणखी वाढेल. १९ एप्रिलच्या जवळपास विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वाऱ्यांसह जोरदार पाऊस होऊ शकतो. नागपूरलादेखील अशीच स्थिती राहू शकते.