जीवनमान निर्देशांकाच्या यादीत नागपूर ३१ व्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 10:53 AM2018-08-14T10:53:47+5:302018-08-14T10:54:17+5:30

देशभरातील १११ शहरात करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या आधारावर जीवनमान निर्देशांकाची यादी जाहीर करण्यात आली. यात नागपूर शहर ३१ व्या क्रमांकावर आहे.

Nagpur is at 31st in the list of lifelong indices | जीवनमान निर्देशांकाच्या यादीत नागपूर ३१ व्या क्रमांकावर

जीवनमान निर्देशांकाच्या यादीत नागपूर ३१ व्या क्रमांकावर

Next
ठळक मुद्देस्वच्छता सर्वेक्षणात नागपूर ५५ व्या क्रमांकावर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशभरातील १११ शहरात करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या आधारावर जीवनमान निर्देशांकाची यादी जाहीर करण्यात आली. यात नागपूर शहर ३१ व्या क्रमांकावर आहे. देशातील टॉपटेन शहरात महाराष्ट्रातील पुणे, नवी मुंबई व ग्रेटर मुंबई यांनी स्थान मिळविले आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात मात्र नागपूर अव्वलस्थानी आहे. तर स्वच्छता सर्वेक्षणात नागपूरचा ५५ वा क्रमांक आहे. क्रमवारीचा विचार करता नागपूर अजूनही जीवनमान सुविधांच्या बाबतीत मागे आहे. शासकीय, सामाजिक, आर्थिक व भौतिक संरचनेच्या आधारावर हे सर्वेक्षण करण्यात आले. दरम्यान नागपूर शहराला मिळालेल्या ३१ व्या क्रमांकाबाबत महापौर नंदा जिचकार यांनी समाधान व्यक्त केले आहे. नागपूर शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी ई-रिक्षा, ई-कार चालविली जात आहे. भविष्यात इलेक्ट्रिक बस धावणार आहेत. प्रदूषण कमी करण्यात नागपूर टॉप टेन शहराच्या यादीत येईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात शहराचा सर्वांगिण विकास होत आहे. दूषित पाण्यावर प्रक्रियेत १३ वा क्रमांक मिळणे ही सकारात्मक बाब आहे.

Web Title: Nagpur is at 31st in the list of lifelong indices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर