नागपूर @ ४६.४ : वाढता पारा, घामाच्या धारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 12:45 AM2019-06-05T00:45:00+5:302019-06-05T00:45:43+5:30

मंगळवारी नागपुरातील वातावरण ढगाळलेले असूनदेखील शहरवासीयांना गरमीपासून दिलासा मिळाला नाही. उलट विदर्भातील सर्वात जास्त तापमान नागपुरात नोंदविण्यात आले. शिवाय ढगाळ वातावरणामुळे उकाडा प्रचंड प्रमाणात जाणवत होता. घराबाहेर निघाल्यानंतर दमटपणा जाणवत होता व घामाच्या धारा लागत असल्याचे चित्र होते. अशा वातावरणामुळे कूलरदेखील थंडावा देत नसल्याने नागरिक हैराण झाले होते.

Nagpur @ 46.4: Increasing mercury, sweating flow | नागपूर @ ४६.४ : वाढता पारा, घामाच्या धारा

नागपूर @ ४६.४ : वाढता पारा, घामाच्या धारा

Next
ठळक मुद्देढगाळ वातावरणामुळे उष्म्यात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मंगळवारी नागपुरातील वातावरण ढगाळलेले असूनदेखील शहरवासीयांना गरमीपासून दिलासा मिळाला नाही. उलट विदर्भातील सर्वात जास्त तापमान नागपुरात नोंदविण्यात आले. शिवाय ढगाळ वातावरणामुळे उकाडा प्रचंड प्रमाणात जाणवत होता. घराबाहेर निघाल्यानंतर दमटपणा जाणवत होता व घामाच्या धारा लागत असल्याचे चित्र होते. अशा वातावरणामुळे कूलरदेखील थंडावा देत नसल्याने नागरिक हैराण झाले होते.
मंगळवारी नागपुरात ४६.४ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविण्यात आले. सोमवारहून तापमानात ०.७ अंश सेल्सिअसची वाढ झाली. सरासरीहून हे तापमान चार अंशाहून अधिक होते. आर्द्रता आणि कडक ऊन यामुळे गरमी जास्त प्रमाणात जाणवत आहे. सकाळी नागपुरात आद्रतेची पातळी ५१ टक्के इतकी होती. त्यानंतर घट होत सायंकाळी ५.३० वाजता ही पातळी २५ टक्क्यांवर आली. मात्र यामुळे दिवसभर नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.
नागपुरात साधारणत: नवतपा संपल्यानंतर पारा घसरायला सुरुवात होते. मात्र एप्रिलपासून सुरू झालेले गरमीचे वातावरण अद्यापही कायम आहे.
नागपुरसह विदर्भात अद्यापही ‘रेड अलर्ट’ कायम आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार ६, ७ व ८ जूनला तापमान ४७ अंशाहून अधिक राहू शकते तर १० जूनपर्यंत पारा ४५ अंशाहून अधिक असेल.

Web Title: Nagpur @ 46.4: Increasing mercury, sweating flow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.