नागपुरात पाण्यात अडकलेल्या ७११ जणांना सुरक्षित बाहेर काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 11:13 PM2018-07-06T23:13:02+5:302018-07-06T23:14:55+5:30

नागपूरसह परिसरात शुक्रवारी अवघ्या सहा तासात २६३.०५ मि.मी. पाऊ स कोसळला. नद्या व नाल्यांना पूर आल्याने शहरात गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली. २०० हून अधिक वस्त्यात पाणी साचले. ३७ चौक व रस्त्यावर पाणी तुंबले. शहराच्या विविध भागात ७११ नागरिक पुराच्या पाण्यात अडकले. यात ६०० विद्यार्थ्यांचाही समावेश होता.या सर्वांना महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या बचाव पथकाने बोट व दोराच्या साह्याने सुरक्षितपणे बाहेर काढले.

In Nagpur 711 people rescued safely | नागपुरात पाण्यात अडकलेल्या ७११ जणांना सुरक्षित बाहेर काढले

नागपुरात पाण्यात अडकलेल्या ७११ जणांना सुरक्षित बाहेर काढले

Next
ठळक मुद्देअग्निशमन विभागाचे बचाव कार्य : ६ जनावरांचे प्राण वाचविले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरसह परिसरात शुक्रवारी अवघ्या सहा तासात २६३.०५ मि.मी. पाऊ स कोसळला. नद्या व नाल्यांना पूर आल्याने शहरात गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली. २०० हून अधिक वस्त्यात पाणी साचले. ३७ चौक व रस्त्यावर पाणी तुंबले. शहराच्या विविध भागात ७११ नागरिक पुराच्या पाण्यात अडकले. यात ६०० विद्यार्थ्यांचाही समावेश होता.या सर्वांना महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या बचाव पथकाने बोट व दोराच्या साह्याने सुरक्षितपणे बाहेर काढले. पोहरा नदीच्या पुराचे पाणी पुलावरून वाहू लागल्याने वर्धा मार्गावरील वाहतूक काही तास बंद ठेवण्यात आली. या मार्गावर तीन ते चार फूट पाणी साचले होते. रिंंंगरोडवर अशीच परिस्थिती होती. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली. पोहरा नदीच्या पुरामुळे पिंपळा फाटा, बहादुरा, नरसाळा भागातील अनेक घरे पाण्याखाली आली. शेकडो नागरिक अडकून पडले. जीव वाचविण्यासाठी अनेकजण घराच्या छतावर अडकू न पडले होते.
हुडके श्वर येथील आदर्श संस्कार शाळेत ४५० तर वसतीगृहात १५० विद्यार्थी पाण्यात अडक ले होते. याच भागातील साईनगर येथील २४ तर पुलाजवळील भारत पेट्रोलियम कंपनीच्या पेट्रोल पंपाच्या बाजुच्या वस्तीत अडकलेल्या ८० जणांना दोर व बोटीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. हुडकेश्वर खूर्द येथून ९ जणांना, अड्याळ येथे २ जणांना, खापरी नाका भागातील झोपडपट्टीत राहणारी वृद्ध महिला, बेलतरोडी येथून ४ जणांना, उमरेड मार्गावरील कमळना फार्महाऊ स येथून ५ जणांना, कळमना गावातून ५ जणांना तसेच ६ शेळ्यांना तसेच विहिरीगाव येथे ३ जणांना पाण्यातून बाहेर काढून सुरिक्षित स्थळी हलविण्यात आले. अग्निशमन विभागाच्या आपत्ती निवारण कक्षाकडे शहराच्या विविध भागात पूर वा पाणी साचल्याच्या १६८ तक्रारी आल्या.
शहरातील ३५०० सीसीटीव्हीच्या माध्यमातून महापालिकेच्या कंट्रोल रूमचा वॉच असल्याने मदत कार्याला मदत झाली. शहर पाण्यात असताना मदत कार्यासासाठी मदत झाली.

शहरातील पिंपळा फाटा, बेसा,बेलतरोडी, भामटीरोड, हुडकेश्वर, जयताळा, कमळना गाव, बहादुरा, हावरपेठ, सोमलवाडा, सुदर्शननगर, शांतिनगर, शिवशक्ती ले-आऊ ट, विधानभवन परिसर, दिघोरी, नवजीवन कॉलनी, सोनेगाव, सुभाषनगर, रमा नगर, एनआयटी ले-आऊ ट, मानेवाडा रोड, बेसा पॉवर हाऊ स, गोपालनगर, नरेंद्रनगर, गंजीपेठ, नंदनवन, सक्करदरा, लकडगंज, रामेश्वरी, राजीवनगर झोपडपट्टी, उदयनगर रिंगरोड, ओमकार नगर, एअरपोर्ट सेंटर पॉर्इंट हॉटेलच्या मागील परिसर, बुटीबोरी येथील टायर कंपनीचा परिसर, हिंगणा रोड, उंटखाना मेडिकल रोड, काचीपुरा रामदासपेठ, सीताबर्डी, त्रिमूर्ती नगर, प्रतापनगर, सुयोग नगर, महाराज बाग ते व्हेरायटी चौक, छापरु नगर, घोगली, आकाशवाणी चौक आदी भागात पाणी साचले होेते.

अग्निशमन विभागाचे बचाव व मदत कार्य
-बचाव पथकातील १५ जवानांच्या मदतीने हुडकेश्वर रोडवरील आदर्श संस्कार विद्यालयातील ४५० विद्यार्थ्यांना बोट व दोराच्या साहाय्याने सुखरुप बाहेर काढले.
-आदर्श संस्कार विद्यालयाच्या उंटखाना येथील वसतिगृहातील १५०विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले.
- हुडके श्वर रोडवरील साईनगर येथील नाल्याच्या पुरात अडकलेल्या २४ जणांना बोटीच्या मदतीने बाहेर काढले.
-हुडके श्वर मार्गावरील भारत पेट्रोलियम कंपनीच्या पेट्रोल पंपाजवळील पुलाजवळ पुरात अडकलेल्या ८० लोकांना बोटीच्या मदतीने सुरक्षितपणे बाहेर काढले.
- खापरी नाका येथील राजाराम झोपडपट्टीतील एका वृद्ध महिलेला दोराच्या साहाय्याने बाहेर काढले.
-हुडकेश्वर खुर्द येथे पुरात अडकलेल्या नऊ लोकांना दोराच्या साहाय्याने सुखरुप बाहेर काढले.
-हुडकेश्वर खुर्द नजिकच्या अड्याळ गावातील दोन घरात अडकलेल्या चार जणांना सुरक्षित स्थळी हलविले.
- बेलतरोडी रोडवरील समाधान ले-आऊ ट साकेत नगर येथील घरात अडकलेल्या चार जणांना दोराच्या साहाय्याने बाहेर काढले.
-उमरेड रोडवरील विहीरगाव लगतच्या कळमना गावातील फार्म हाऊ समध्ये अडकलेल्या एका कुटुंबातील पाच जणांना बाहेर काढले.
- उमरेड रोडवरील कळमना गावातील पाण्यात अडलेल्या पाच जणांना व सहा शेळ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले.
- उमरेड रोडवरील विहिरीगाव येथील एका इमारतीत अडलेल्या तीन जणांना सुरक्षितपणे बाहेर काढले.
- काटोल मार्गावर खड्ड्यात पडलेल्या गाईला बाहेर काढून जीवदान दिले.
- शहराच्या विविध भागात १६८ ठिकाणी पाणी साचल्याच्या तक्रारी महापालिके च्या अग्निशमन विभागाच्या आपत्ती निवारण कक्षाला प्राप्त झाल्या.
-एफएम रेडिओ, स्थानिक वृत्त वाहिन्या व वृत्तपत्राच्या माध्यमातून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
-नागनदी लगतच्या नंदनवन झोपडपट्टी, पिवळी नदी काठावरील वस्त्यांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

Web Title: In Nagpur 711 people rescued safely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.