नागपुरात गुरुवारी ७३ ओमायक्राॅनबाधित; आतापर्यत ६४ पोलिसांना कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 07:58 PM2022-01-13T19:58:19+5:302022-01-13T20:05:14+5:30
Nagpur News गुरुवारी उपराजधानीत ७३ ओमायक्रॉनबाधितांची नोंद करण्यात आली. तर पोलिसदलातील १७ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांची संख्या आता ६५ झाली आहे.
नागपूर: गुरुवारी उपराजधानीत ७३ ओमायक्रॉनबाधितांची नोंद करण्यात आली. तर पोलिसदलातील १७ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांची संख्या आता ६५ झाली आहे.
"सलाईन गार्गल' या जीनोम सिक्वेंसिंगच्या नव्या पद्धतीमुळे नागपुरातील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्था म्हणजेच नीरीमध्ये जीनोम सिक्वेसिंग होते. गुरूवारी करण्यात आलेल्या चाचणीत ७३ पैकी सर्व ७३ ओमायक्राॅन बाधित निघाले. यापूर्वी रविवार ९ जानेवारी रोजी करण्यात आलेल्या चाचणीत ५३ जण ओमायक्राॅन बाधित निघाले होते. दोन्ही मिळून ओमायक्राॅन बाधितांची संख्या १२६ इतकी झाली आहे.
दरम्यान गुरूवारी नागपूर पोलिसदलातील १७ पोलिस कोरोना बाधित निघाले. त्यामुळे पोलिसदलातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ६४ इतकी झाली आहे. यात ६ अधिकारी आहे. दरम्यान शहर व जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा रोज वाढत आहे. गुरूवारी ग्रामीणमध्ये ४३४, शहरात १५८९ व जिल्ह्याबाहेरील ६३ मिळून २०८६ बाधितांची नोंद करण्यात आली. तर महापालिकेच्या नोंदीनुसार दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला