नागपुरात ‘व्हेरिफिकेशन’च्या नावावर ७.५० लाख गमावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 11:02 PM2020-05-13T23:02:50+5:302020-05-13T23:06:19+5:30

सायबर गुन्हेगारांनी बँक खाते व्हेरिफिकेशनच्या नावावर एका ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यातून ७.५० लाख रुपये लंपास केले. ही घटना प्रतापनगर पोलीस ठाणे अंतर्गत पांडे ले-आऊट येथे उघडकीस आली.

In Nagpur, 7.50 lakh was lost in the name of 'verification' | नागपुरात ‘व्हेरिफिकेशन’च्या नावावर ७.५० लाख गमावले

नागपुरात ‘व्हेरिफिकेशन’च्या नावावर ७.५० लाख गमावले

Next
ठळक मुद्देसायबर गुन्हेगारांचे कृत्य : वाढत आहे घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सायबर गुन्हेगारांनी बँक खाते व्हेरिफिकेशनच्या नावावर एका ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यातून ७.५० लाख रुपये लंपास केले. ही घटना प्रतापनगर पोलीस ठाणे अंतर्गत पांडे ले-आऊट येथे उघडकीस आली.
७८ वर्षीय पादिनजाकरा राजमगोपालन मेनन हे पांडे ले-आऊट येथे पत्नीसोबत राहतात. ते शहरातील एका वरिष्ठ डॉक्टरांचे सासरे आहेत. पोलीस सूत्रानुसार मेनन यांचे आयसीआयसीआय बँकेत खाते आहे. त्यांना ११ मे रोजी सकाळी मोबाईलवर एक फोन आला. त्याने त्यांचे मोबाईल खाते ब्लॉक झाल्याचे सांगत मोबाईल क्रमांक ९३९२०२८०३८ वर संपर्क करण्यास सांगितले. मेनन यांनी त्यावर संपर्क केला. त्यांना खाते अ‍ॅक्टीव्ह करण्यासाठी व्हेरिफिकेशन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. यासाठी त्यांना ८३९२०२८०३८ या क्रमांकाने एक लिंक पाठवत असल्याचे सांगत ती डाऊनलोड करण्यास सांगितले. मेनन यांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तसेच केले. लिंक डाऊनलोड केल्यानंतर ते झोपी गेले. दुपारी ३ वाजता त्यांच्या मोबाईलवर अनेक मॅसेज आले. यात त्यांच्या खात्यातून ७.५० लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर झाल्याचे उघडकीस आले. चौकशी केली असता त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
मेनन यांनी प्रतापनगर पोलीस आणि सायबर सेलकडे तक्रार केली. सायबर सेलने लगेच बँकेशी संपर्क केला. परंतु तेव्हापर्यंत बँकेतून पैसे निघालेले होते. यानंतर पोलिसांनी फसवणूक व आयटी अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मेनन यांची फसवणूक करण्यात आली. याप्रकारे सायबर गुन्हेगार अलीकडे अनेकांची फसवणूक करीत आहेत. मेनन यांना लिंकच्या नावावर ‘अप क्लोनर’ पाठवण्यात आले होते. त्याला डाऊनलोड करताच त्या मोबाईलपर्यंत सायबर गुन्हेगार पोहोचतात. त्या मोबाईलवर येणारे सर्व मॅसेज सायबर गुन्हेगारांना दिसतात. तो मोेबाईल बँक खात्याशी लिंक असेल तर सायबर गुन्हेगार ऑनलाईन व्यवहार करून येणारी ओटीपीसुद्धा माहीत करून घेतात. सायबर गुन्हेगार युपीआय (युनिफाईड पेमेंट इंटरफेस)चा वापर करून काही मिनिटात बँकेला चुना लावतात. तात्काळ पेमेंटची ही यंत्रणा असून सायबर गुन्हेगार याचा वापर करीत आहेत.

पाच-सहा पद्धतींचा वापर
सायबर गुन्हेगार ‘लिंक डाऊनलोड’ करण्यासाठी पाच ते सहा पद्धतींचा वापर करतात. यामुळे बँक खाते काही मिनिटांतच खाली होत आहे. ऑनलाईन पेमेंट वाढल्याने लोक सहजपणे फसवले जात आहेत. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त नीलेश भरणे यांनी नागरिकांना लिंक डाऊनलोड किंवा बँक खात्याची माहिती कुणालाही न सांगण्याचे आवाहन केले आहे. अशी चूक केली असेल तर लगेच सायबर सेलकडे तक्रार करावी, असेही म्हटले आहे.

मुंबईतही फसवणूक
सायबर गुन्हेगारांनी ज्या बँक खात्यात ७.५० लाख रुपये ट्रान्सफर केले आहेत. त्या माध्यमातून मुंबईतील मुलुंडमध्येही १.७२ लाख रुपयाची फसवणूक केली आहे. सायबर सेलच्या विनंतीवर खाते फ्रीज करण्यात आले आहे. या प्रकरणाचे धागे कुख्यात जातमाडा गँगशी जुळले असल्याचा संशय आहे.

Web Title: In Nagpur, 7.50 lakh was lost in the name of 'verification'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.