Nagpur | मोठ्या गणेश मंडळांत मिळणार 'बूस्टर डोस'; विसर्जन कृत्रिम जलकुंभातच करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2022 12:01 PM2022-09-01T12:01:09+5:302022-09-01T12:34:42+5:30

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची माहिती

Nagpur | A 'booster dose' will be available in the big Ganesha mandal; appeal to do immersion in artificial lakes | Nagpur | मोठ्या गणेश मंडळांत मिळणार 'बूस्टर डोस'; विसर्जन कृत्रिम जलकुंभातच करण्याचे आवाहन

Nagpur | मोठ्या गणेश मंडळांत मिळणार 'बूस्टर डोस'; विसर्जन कृत्रिम जलकुंभातच करण्याचे आवाहन

Next

नागपूर : सामाजिक दायित्व निभवण्यासाठी जिल्ह्यातील मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आरोग्य विभागाला बूस्टर डोस लावण्याकामी स्टॉलकरिता जागा द्यावी व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्ताला बूस्टर डोस देऊन कोरोनापासून सुरक्षित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

या संदर्भात आरोग्य, गृह, महसूल व अन्य विभागांचा आढावा घेताना त्यांनी शांततेत, धार्मिक सौहार्द राखत, आनंदाने या वर्षीचा गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले. गेल्या दोन वर्षांनंतर कोरोनाच्या सावटातून बाहेर पडल्यानंतर हा गणेशोत्सव होत आहे. मात्र अनेक भागांत कोरोना अद्याप असून, त्याच्यापासून बचावासाठी एकमेव उपाय म्हणजे लसीकरण आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांना बूस्टर डोस देण्याबाबत आरोग्य विभागाला सूचना केली आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात आपल्या आरोग्याप्रती जागरूकता दाखवून सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

आदेशाची पायमल्ली होऊ नये

गणेशोत्सवाच्या आगमनाच्या व विसर्जनाच्या मिरवणुकीत शिस्त ठेवण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याशिवाय विसर्जन हे कोणत्याही परिस्थितीत सर्व ठिकाणी असलेल्या कृत्रिम जलकुंभांत झाले पाहिजे. न्यायालयाने दिलेल्या आदेशाची पायमल्ली होता कामा नये, असेही त्यांनी पोलीस विभागाला स्पष्ट केले आहे. महापालिकेने सर्व मिरवणुकांच्या ठिकाणी व विसर्जनाच्या ठिकाणी कृत्रिम जलकुंभांची, प्रकाशाची व अन्य आवश्यक व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तसेच महापालिका क्षेत्रामध्येसुद्धा कृत्रिम जलकुंभ तयार करून त्याच ठिकाणी विसर्जन करावे. नैसर्गिक जलसाठे अशुद्ध होणार नाहीत, असेही ते म्हणाले.

Web Title: Nagpur | A 'booster dose' will be available in the big Ganesha mandal; appeal to do immersion in artificial lakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.