Nagpur | मालगाडी रुळावरून घसरली; कळमना यार्डजवळील घटना
By नरेश डोंगरे | Updated: September 29, 2022 13:48 IST2022-09-29T13:47:20+5:302022-09-29T13:48:30+5:30
कुठलेही मोठे नुकसान नाही

Nagpur | मालगाडी रुळावरून घसरली; कळमना यार्डजवळील घटना
नागपूर :रेल्वे यार्डकडे जात असलेली खाली (रिकामी) मालगाडी रुळावरून घसरली. सुदैवानं या घटनेत कुणाला दुखापत झाली नाही. रेल्वेचे कोणतेही मोठे नुकसान झाले नाही.
आज सकाळी 11.05 च्या सुमारास खाली मालगाडी एन बॉक्स ( Goods train N -box/N121) कळमना यार्डकडे जात असताना (केआरडी /22) डब्याची दोन चाके घसरली. हा प्रकार लक्षात येतात चालकाने लगेच मालगाडी थांबवली. या अपघाताची माहिती रेल्वे कंट्रोल रूम तर्फे वरीष्ठ अधिकार्यांना देण्यात आली. त्यामुळे रेल्वेचे अनेक वरिष्ठ घटनास्थळाकडे पोहोचले. त्यांनी पाहणी केली असता अपघातामुळे मुख्य रेल्वे लाईनला किंवा अपघातग्रस्त मालगाडीच्या डब्याला कुठलेही मोठे नुकसान झाले नसल्याचे लक्षात आले. दरम्यान, मालगाडीचा वेग कमी असल्याने कुठलेही नुकसान झाले नाही. मात्र हा अपघात नेमका कसा झाला, ते स्पष्ट झाले नाही. त्याची चौकशी रेल्वे अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.
गाडी रुळावर आणण्यासाठी प्रयत्न
या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. वृत्त लीहिस्तोवर घसरलेला रेल्वेचा डबा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते.