नागपूर दुर्घटना : पाच मिनिटासाठी बाहेर आला अन् जीव वाचला; कामगारानं सांगितली आपभीती
By जितेंद्र ढवळे | Published: December 17, 2023 02:56 PM2023-12-17T14:56:04+5:302023-12-17T14:56:33+5:30
कंपनी परिसर सील करण्यात आला असून कोणालाही आतमध्ये सोडले जात नाही.
सोलार एक्सप्लोसिव कंपनी चाकडोह ( जि. नागपूर ) येथे रविवारी सकाळी 9 वाजाता झालेल्या स्फोटात 6 महिला व 3 पुरुष अश्या एकूण 9 कामगारांचा मृत्यू झाला तर तीन लोक बचावले. या घटनेनंतर कंपनीतील कामगाव त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली असून मोठा आक्रोश सुरू आहे. दरम्यान, मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. तसेच, कंपनी परिसर सील करण्यात आला असून कोणालाही आतमध्ये सोडले जात नाही.
या घटनेपूर्वी कंपनीतील कामगार संजय गुलाबराव आडे फक्त पाच मिनिटांसाठी बाहेर आले. त्यामुळे त्यांच्या जीव वाचला. संजय गुलाबराव आडे (51) हे सोलार कंपनीत गत 20 वर्षांपासून कामगार म्हणून काम करतो. त्यांनी माहिती दिली की, आज सकाळी 6 ते दुपारी 2 पर्यतच्या शिफ्टमध्ये सीबीएच 2 प्लांट मध्ये कामावर असताना युनिटमधील सुपरवायझर मोसम राजकुमार पटेल यांनी त्यांना रिकामे खड्ड्याचे खोके युनिट बाहेर नेण्यास सांगितले. त्यामुळे ते खोके घेऊन बाहेर गेले. खोके ठेवून परत येत असताना ते युनिटपासून 100 मिटर अंतरावर असताना हा भीषण स्फोट झाला. त्यांच्या डोळ्या देखत सीबीएच 2 ची संपूर्ण इमारत जवळपास 50 फूट उंच उसळून खाली कोसळली. त्यात सुपरवायझर मोसम पटले सह 9 लोकांचा मृत्यू झाला.
दरम्यान, घटनास्थळ संपूर्ण सील करण्यात आले आहे. जोपर्यंत घटनास्थळ सुरक्षीत अल्याचा अहवाल येत नाही, तोपर्यंत मृतदेह बाहेर काढता येणार नाही. NDRF सह इतर टीम घटानास्थळी पोहचत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात येतील. दरम्यान, कंपनीतील कामगार आक्रमक झाले असून मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स तैनात करण्यात आली आहे.
मृतांची नावे अशी -
1) युवराज किसनाजी चारोडे बाजारगाव
2) ओमेश्वर किसनलल मछिर्के चाकडोह, ता. नागपूर
3) मिता प्रमोद उईके अंबाडा सोनक ता. काटोल, जि. नागपूर
4)आरती निळकंठा सहारे
ता. कामठी, जि. नागपूर
5) श्वेताली दामोदर मारबते कन्नमवार जि. वर्धा
6) पुष्पा श्रीरामजी मानापुरे शिराला जि. अमरावती
7) भाग्यश्री सुधाकर लोनारे भुज, ब्रम्हपुरी
8) रुमिता विलास उईके ढगा जि. वर्धा
9) मोसम राजकुमार पटले पांचगाव जि.भंडारा.