नागपुरात अपघाताच्या प्रमाणात ९.५४ टक्क्यांनी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 01:07 AM2018-02-23T01:07:21+5:302018-02-23T01:08:59+5:30

नागपूर शहरात २०१७ मध्ये १२४२ अपघात झाले असून, यात २३१ नागरिकांचा मृत्यू झाला तर १२५६ जखमी झाले. परंतु गेल्या वर्षी अपघातांना घेऊन केलेल्या जनजागृतीमुळे प्रथमच अपघाताची संख्या कमी झाली. अपघाताचे प्रमाण ९.५४ टक्क्यांनी घटले.

In Nagpur accident decreased by 9.54 percent |  नागपुरात अपघाताच्या प्रमाणात ९.५४ टक्क्यांनी घट

 नागपुरात अपघाताच्या प्रमाणात ९.५४ टक्क्यांनी घट

Next
ठळक मुद्दे२०१६ मध्ये १३७३ तर २०१७ मध्ये १२४२ अपघात

 लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रस्ते अपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होतात. ते निश्चितच टाळता येतात. असे असतानाही रस्ता वापरणाऱ्या घटकांनी याबाबत गंभीरपणे दखल घेतल्याचे दिसत नाही. नागपूर शहरात २०१७ मध्ये १२४२ अपघात झाले असून, यात २३१ नागरिकांचा मृत्यू झाला तर १२५६ जखमी झाले. परंतु गेल्या वर्षी अपघातांना घेऊन केलेल्या जनजागृतीमुळे प्रथमच अपघाताची संख्या कमी झाली. अपघाताचे प्रमाण ९.५४ टक्क्यांनी घटले.
वाढत्या शहरीकरणामुळे मुख्य रस्तेच नाही तर वसाहतीमधील रस्त्यांवरील वाहतूक समस्या बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव यामुळे जलद आणि सुरक्षित प्रवास करणे कठीण झाले आहे. यातच पार्किंगच्या जागा मर्यादित असल्याने व रस्त्यावरील अतिक्रमण व फेरीवाले यामुळे ही परिस्थिती अधिकच अवघड होत चालली आहे, शिवाय प्रदूषणामुळे आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. पोलीस उपायुक्त (वाहतूक) यांनी उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, २०१६ मध्ये नागपूर शहरात १३७३ अपघात झाले होते. यात ३०७ मृत्यू तर १५१० नागरिक जखमी झाले. २०१५ च्या तुलनेत अपघाताचा हा आकडा ४.८१ टक्क्यांनी वाढला होता.
आठ वर्षांत पहिल्यांदाच प्रमाण घटले
नागपूर शहरात २०१३ मध्ये १०२९, २०१४ मध्ये ११४८ अपघात झाले. अपघाताचे हे प्रमाण ११.५६ टक्क्यांनी वाढले होते. २०१५ मध्ये १३१० अपघात होऊन यात १४.११ टक्क्यांनी वाढ झाली. २०१६ मध्ये १३७३ अपघात होऊन प्रमाण ४.८१ टक्क्यांपर्यंत पोहचले. मात्र २०१७ मध्ये १२४२ अपघात होऊन अपघाताचे प्रमाण ९.५४ टक्क्यांनी कमी झाले. गेल्या आठ वर्षात पहिल्यांदाच अपघाताची संख्या घटली.
मृत्यूचे प्रमाण २४.७६
रस्ते अपघातात २०१३ मध्ये २४८ तर २०१४ मध्ये २८६ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. हे प्रमाण १५.३२ टक्के एवढे होते. २०१५ मध्ये रस्ता अपघातातील मृत्यूचे हे प्रमाण ८.३९ टक्क्यांनी कमी झाले. त्यावर्षी २६२ नागरिकांचा मृत्यू झाला. २०१६ मध्ये पुन्हा अपघातातील मृत्यूचे प्रमाण वाढले. ३९७ मृत्यूची नोंद झाली. १७.१८ टक्क्यांनी हे प्रमाण वाढले होते. मात्र २०१७ मध्ये मृत्यूचे प्रमाण २४.७६ टक्क्यांनी घसरले. या वर्षात २३१ मृत्यू झाले.

Web Title: In Nagpur accident decreased by 9.54 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.