नागपुरात ३४६ आॅटोरिक्षांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 10:00 PM2018-08-31T22:00:31+5:302018-08-31T22:01:34+5:30

वाहतूक विभागाने शुक्रवारी आॅटोरिक्षांवर धडक कारवाई करीत ३४६ दोषी आॅटोंवर कारवाई केली. यात नियमानुसार गणवेश न घातलेले २०१, पुढच्या सीट्सवर प्रवाशांना बसविलेले २८, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविलेल्या ११२ तर बॅच नसलेल्या पाच आॅटोरिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. आठवडाभरात या दुसऱ्या मोठ्या कारवाईने आॅटोचालकांचे धाबे दणाणले आहे. काही आॅटोरिक्षा संघटना आंदोलनाच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

In Nagpur, action against 346 Auto-rickshaw |  नागपुरात ३४६ आॅटोरिक्षांवर कारवाई

 नागपुरात ३४६ आॅटोरिक्षांवर कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देवाहतूक विभागाची मोहीम : गणवेश नसलेले २०० चालक

  लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाहतूक विभागाने शुक्रवारी आॅटोरिक्षांवर धडक कारवाई करीत ३४६ दोषी आॅटोंवर कारवाई केली. यात नियमानुसार गणवेश न घातलेले २०१, पुढच्या सीट्सवर प्रवाशांना बसविलेले २८, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविलेल्या ११२ तर बॅच नसलेल्या पाच आॅटोरिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. आठवडाभरात या दुसऱ्या मोठ्या कारवाईने आॅटोचालकांचे धाबे दणाणले आहे. काही आॅटोरिक्षा संघटना आंदोलनाच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
शहरात आॅटोरिक्षाची संख्या १० हजारावर गेली आहे. परंतु अनेक आॅटोरिक्षाचालक नियम तुडवीत धावत असल्याच्या तक्रारी वाढल्याने पोलीस उपआयुक्त (वाहतूक) राज तिलक रोशन यांच्या निर्देशानुसार ही कारवाई हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार २४ आॅगस्ट रोजी कारवाई करण्यात आली. यात ४४४ आॅटोचालक दोषी आढळून आले. याला आठवडा होत नाही तोच शुक्रवारी पुन्हा कारवाईची मोहीम सर्व परिमंडळामार्फत राबविण्यात आली. यात एमआयडीसी परिमंडळ अंतर्गत २० आॅटोरिक्षांवर, सोनेगाव परिमंडळांतर्गत आठ, सीताबर्डी परिमंडळांतर्गत ५९, सदर परिमंडळांतर्गत १७, कॉटन मार्केट परिमंडळांतर्गत १२१, अजनी परिमंडळांतर्गत ४५, इंदोरा परिमंडळांतर्गत ७६ अश्ी एकूण ३४६ आॅटोचालकांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई नियमिीत राहणार असल्याचे पोलीस उपायुक्त रोशन यांनी कळविले आहे.
विद्यार्थ्यांच्या १२० दुचाकी जप्त
विनाहेल्मेट, ट्रिपल सीट व दुचाकी चालविताना मोबाईल व हेडफोनचा वापर करणाºया विद्यार्थ्यांवर वचक बसावा म्हणून वाहतूक विभागाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. गुरुवार ३० आॅगस्ट रोजी ७४२ दुचाकी चालकांवर चालान कारवाई करण्यात आली. यातील १२० वाहने जप्त करण्यात आली. ही कारवाई सेंट झेव्हिअर्स, आंबेडकर कॉलेज, जी.एस. कॉलेज, शिवाजी सायन्स कॉलेज, तिडके विद्यालय, अंशुमन कॉलेज, सिंधू-हिंदू कॉलेज, व्हीएमव्ही कॉलेज, प्रेरणा कॉन्व्हेंट, केडीके कॉलेज, पीडब्ल्यूएस कॉलेज व पोरवाल कॉलेजच्या समोर करण्यात आली.

Web Title: In Nagpur, action against 346 Auto-rickshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.