नागपूर विमानतळ ‘सी-एटीएफएम’शी जोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 11:06 AM2018-10-05T11:06:45+5:302018-10-05T11:08:45+5:30
रस्ते आणि रेल्वेला काही वेळ थांबविण्यासाठी लावण्यात आलेल्या सिग्नलिंग यंत्रणेची माहिती सर्वांनाच आहे. अशीच यंत्रणा आकाशात विमानांचे उड्डाण नियंत्रित करण्यासाठी आहे. एअर नेव्हिगेशनशी जुळलेली ही यंत्रणा सेंट्रल एअर ट्रॅफिक फ्लो मॅनेजमेंट यंत्रणेशी (सी-एटीएफएम) जुळली आहे.
वसीम कुरैशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रस्ते आणि रेल्वेला काही वेळ थांबविण्यासाठी लावण्यात आलेल्या सिग्नलिंग यंत्रणेची माहिती सर्वांनाच आहे. अशीच यंत्रणा आकाशात विमानांचे उड्डाण नियंत्रित करण्यासाठी आहे. एअर नेव्हिगेशनशी जुळलेली ही यंत्रणा सेंट्रल एअर ट्रॅफिक फ्लो मॅनेजमेंट यंत्रणेशी (सी-एटीएफएम) जुळली आहे.
देशात दरवर्षी घरगुती आणि विदेशी उड्डाणात जवळपास ७ ते ८ टक्के होणाऱ्या वाढीमुळे सर्व मोठ्या विमानतळांवर गर्दी झाली आहे. त्यामुळे विमानांना आकाशात व्यर्थ घिरट्या घालाव्या लागत असल्यामुळे महागडे हजारो लिटर एअर टर्बाइन इंधन (एटीएफ) विनाकारण खर्च होते. एअरपोर्ट अॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या नेव्हिगेशन शाखेने सेंट्रल एअर ट्रॅफिक फ्लो मॅनेजमेंट यंत्रणा तयार केली असून, ती छोट्या स्वरूपात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बसविण्यात आली आहे.
कसे काम करते सी-एटीएफएम
कोणत्याही विमानतळावर कोणत्याही विमानाच्या उड्डाणादरम्यान जवळपास त्याचवेळी उतरणाºया विमानाच्या आकाशात घिरट्या टाळण्यासाठी या विमानाच्या उड्डाण भरण्याच्या वेळेला आधीच मॅनेज करण्यात येते. सी-एटीएफएममुळे काही विमानांना विलंब होतो. पण हवाई प्रवास सुरक्षित होतो. आकाशात विमान घिरट्या घालत असताना प्रवासी काहीही करू शकत नाही, पण जमिनीवर वाट पाहताना त्यांना कोणत्याही प्रकारे वेळ घालविता येतो.
इंधनाचे नुकसान होणार नाही
सी-एटीएफएम यंत्रणेमुळे आकाशात घिरट्या घालणाऱ्या विमानांचे इंधन जास्त खर्च होते. सर्व प्रमुख विमानतळ या यंत्रणेच्या नेटवर्कमध्ये आहेत. त्याअंतर्गत कोणते विमान केव्हा उड्डाण भरेल, हे निश्चित केले जाते. सुरक्षा आणि इंधनाच्या बचतीला ध्यानात ठेवून कुठलाही वेळ खर्ची न घालता विमान उतरविण्यात येते. ही एअर नेव्हिगेशन सर्व्हिसची (एएनएस) एक मोठी उपलब्धी आहे.
एटीसीची जबाबदारी वाढली
विमानांची ये-जा नियंत्रित करणाऱ्या एअर ट्रॅफिक कंट्रोलची (एटीसी) जबाबदारी या यंत्रणेमुळे वाढली आहे. यंत्रणेच्या माध्यमातून नेव्हिगेशन आणि नियंत्रणात समन्वय आणि संवादाची प्रक्रिया सुरू असते. विमानाचे उड्डाण आणि उतरण्याची परवानगी आता या यंत्रणेला ध्यानात ठेवून देण्यात येत आहे.