नागपूर विमानतळ : सात महिन्यात मिळाले ३१ कोटी रुपयांचा गैरपरिवहन महसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 11:29 PM2018-11-03T23:29:32+5:302018-11-03T23:31:02+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रवासी व अन्य सेवांद्वारे मिहान इंडिया लिमिटेड(एमआयएल)ला गेल्या सात महिन्यात ३१ कोटी रुपयांचा गैरपरिवहन महसूल प्राप्त झाला आहे. विमानतळाचे व्यवस्थापन करणारी कंपनी एमआयएलच्या मते, प्रवाशांना सुविधा पुरविण्याच्या मोबदल्यात आकारण्यात येणाऱ्या शुल्कामुळे सोयीसुविधेत वाढ झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रवासी व अन्य सेवांद्वारे मिहान इंडिया लिमिटेड(एमआयएल)ला गेल्या सात महिन्यात ३१ कोटी रुपयांचा गैरपरिवहन महसूल प्राप्त झाला आहे. विमानतळाचे व्यवस्थापन करणारी कंपनी एमआयएलच्या मते, प्रवाशांना सुविधा पुरविण्याच्या मोबदल्यात आकारण्यात येणाऱ्या शुल्कामुळे सोयीसुविधेत वाढ झाली आहे.
गैरपरिवहन महसुलात युजर डेव्हलपमेंट फी(यूडीएफ)च्या माध्यमातून एमआयएलला एप्रिल ते आॅक्टोबर २०१८ पर्यंत २७ कोटी ११ लाख ४३ हजार ५६३ रुपये प्राप्त झाले आहे. हा आकडा नियमित उड्डाण करणाऱ्या फ्लाईटचा आहे, तर नॉन शेड्यूल्ड फ्लाईटपासून २ कोटी ९३ लाख २६४ रुपये मिळाले आहे. नुकत्याच सीता सॉफ्टवेअरच्या माध्यमातून संचालित केली जात असलेली कॉमन युजर टर्मिनल एक्पिमेंट (क्यूट) सुविधेच्या माध्यमातून घेण्यात येणारे क्यूट शुल्काचे याच काळात १ कोटी ७१ लाख ९३ हजार ९८८ रुपये मिळाले आहे. विशेष म्हणजे क्यूट शुल्कापोटी गोळा होणाऱ्या महसुलाचा ४४ टक्के भाग एमआयएलला मिळत आहे.
सद्यस्थितीत एअरपोर्टवर शेड्यूल फ्लाईट्सचे ४२ डिपार्चल व ४२ अरायव्हल आहे. त्याचबरोबर दर महिन्याला किमान ५० नॉन शेड्यूल्ड फ्लाईटसुद्धा येत-जात राहते. १ नोव्हेंबरपासून इंडिगोचे नागपूर-चेन्नई उड्डाण सुरू झाले आहे. यामुळेसुद्धा विमानतळाच्या गैरपरिवहन महसुलात वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षाच्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. २०१६-१७ मध्ये नागपूर विमातळावरून १९ लाख ३८ हजार प्रवाशांचे येणे-जाणे झाले आहे तर २०१७-१८ मध्ये २१ लाख ७६ हजार ४३९ प्रवाशांनी नागपूर विमानतळावरून प्रवास केला आहे.
आता लाईनमध्ये लागण्याची गरज नाही
विमानतळाच्या गैरपरिवहन महसुलात वाढ होत आहे. क्यूट सिस्टममुळे एअरलाईन्सला कॉमन काऊंटरची सुविधा मिळाली आहे; सोबतच प्रवाशांना लाईनमध्ये लागण्याचीसुद्धा आता गरज राहिली नाही. विमानतळाच्या आत प्रवाशांना प्रक्रिया पूर्ण करून लागणारा वेळसुद्धा कमी झाला आहे.
विजय मुळेकर, वरिष्ठ विमानतळ संचालक, एमआयएल