.. तर नागपूर विमानतळ  धावपट्टीची लांबी होणार कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 11:51 PM2018-06-28T23:51:41+5:302018-06-28T23:52:25+5:30

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने एअरक्रॉफ्ट नियम-१९९४ नुसार ग्रीडनिहाय उंची निर्धारित केली आहे. पण त्याचे उल्लंघन करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सभोवताल उंच इमारती उभ्या राहिल्या आहेत. अटींचे उल्लंघन झाल्याने विमानातील ग्राऊंड प्रॉक्झिमिटी वॉर्निंग (जीपीडब्ल्यू) यंंत्रणा वैमानिकांना धोक्याचा इशारा देत आहे. उंच इमारतींवर स्थानिक प्राधिकरणाने कारवाई न केल्यास भविष्यात धावपट्टीची लांबी ५६० मीटरने कमी करावी लागेल, असा इशारा नागपूर विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेडचे (एमआयएल) वरिष्ठ विमानतळ संचालक विजय मुळेकर यांनी दिला.

.. Nagpur Airport runway length will be less | .. तर नागपूर विमानतळ  धावपट्टीची लांबी होणार कमी

.. तर नागपूर विमानतळ  धावपट्टीची लांबी होणार कमी

googlenewsNext
ठळक मुद्दे विजय मुळेकर : उंच इमारतींमुळे विमानांना धोका, सात इमारतींना नोटिसा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय विमानतळ प्राधिकरणाने एअरक्रॉफ्ट नियम-१९९४ नुसार ग्रीडनिहाय उंची निर्धारित केली आहे. पण त्याचे उल्लंघन करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सभोवताल उंच इमारती उभ्या राहिल्या आहेत. अटींचे उल्लंघन झाल्याने विमानातील ग्राऊंड प्रॉक्झिमिटी वॉर्निंग (जीपीडब्ल्यू) यंंत्रणा वैमानिकांना धोक्याचा इशारा देत आहे. उंच इमारतींवर स्थानिक प्राधिकरणाने कारवाई न केल्यास भविष्यात धावपट्टीची लांबी ५६० मीटरने कमी करावी लागेल, असा इशारा नागपूर विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेडचे (एमआयएल) वरिष्ठ विमानतळ संचालक विजय मुळेकर यांनी दिला.
हिरव्या झोनमधील बांधकामास १५ दिवसात मंजुरी
एएआय नागपूरतर्फे आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेच्या समारोपानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुळेकर म्हणाले, नागपूर विमानतळाच्या धावपट्टीची लांबी ३२०० मीटर आहे. लांबी कमी झाल्यास मोठी आणि मालवाहू विमाने विमानतळावर उतरण्यास अडचण होईल. त्यामुळे ‘एमआयएल’ला आर्थिक नुकसान सोसावे लागेल. विमानतळ परिसरात होणाºया बांधकामांसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. बांधकाम हिरव्या झोनमध्ये असल्यास प्राधिकरणाने विकसित केलेल्या ‘नोकॉस-२’ या आॅनलाईन अप्लीकेशन प्रणालीद्वारे १५ दिवसात प्रमाणपत्र देण्यात येते. पण धावपट्टीलगतच्या जयताळा आणि चिचभुवन परिसरात उंच इमारती उभ्या आहेत. ही बाब २०१६-१७ च्या सर्वेक्षणात पुढे आल्यानंतर सात इमारतींना एमआयएलने नोटिसा जारी केल्या आहेत.
मोठ्या विमानांवर प्रतिबंध लागणार
या संदर्भात मनपाचा प्लॅनिंग टाऊन विभाग आणि नागरी उड्ड्यण महासंचालनालयाशी (डीजीसीए) पत्रव्यवहार केला आहे. वैमानिकही विमान नियंत्रकाकडे वारंवार तक्रारी करीत आहेत. तक्रारींवर कारवाई होत नसेल तर विमानतळाची लांबी कमी करणे आणि मालवाहू व मोठ्या विमानांना विमानतळावर उतरण्यावर प्रतिबंध घालण्याशिवाय प्राधिकरणाकडे पर्याय राहणार नाही. भविष्यात विमानांना चिचभुवनकडून नव्हे तर विमानतळाला वळसा घालून जयताळा परिसरातून धावपट्टीवर उतरावे लागेल. त्यामुळे सध्याच्या कालावधीपेक्षा १० मिनिटे जास्त लागेल व इंधनाचा खर्च वाढेल, असे मुळेकर यांनी स्पष्ट केले. अद्ययावत रडार यंत्रणेमुळे विमान धावपट्टीवर उतरण्याचा वेळ ५ मिनिटांनी कमी झाल्याचे त्यांनी सांगितले.
प्रस्तावित कार्गो धावपट्टीवर परिणाम होणार
उंच इमारतींमुळे प्रस्तावित कार्गो धावपट्टीच्या उभारणीवर परिणाम होणार आहे. प्रस्तावित ४२०० मीटर लांबीच्या धावपट्टीची लांबी कमी करावी लागेल. शिवाय खासगी कंपन्यांच्या माध्यमातून विमानतळाची विकास कामे थांबतील. स्थानिक प्राधिकरणाने विमानतळालगतच्या बांधकामांना मंजुरी देऊ नये, असे ते म्हणाले.

Web Title: .. Nagpur Airport runway length will be less

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.