नागपूर, अजनी, खापरीत ऑटोमॅटिक रेल्वे सिग्नलिंगचे काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 11:06 PM2020-03-20T23:06:16+5:302020-03-20T23:07:05+5:30
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नागपूर-बडनेरा सेक्शन अंतर्गत नागपूर-अजनी-खापरीच्या उप विभागात ऑटोमॅटिक सिग्नलिंग सिस्टिमचे काम वेळेच्या पूर्वी पूर्ण करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नागपूर-बडनेरा सेक्शन अंतर्गत नागपूर-अजनी-खापरीच्या उप विभागात ऑटोमॅटिक सिग्नलिंग सिस्टिमचे काम वेळेच्या पूर्वी पूर्ण करण्यात आले आहे.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांच्या नेतृत्वात आणि सिग्नल व दूरसंचार, परिचालन आणि विद्युत विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कठोर मेहनतीमुळे हे शक्य झाले आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार म्हणाले, ही मोठी उपलब्धी असून आता नागपुरमध्ये रेल्वेगाड्यांची गर्दी कमी होणार आहे. रोड साईड स्टेशनवर रेल्वेगाड्यांसाठी वाट पाहण्याची वेळही कमी होणार आहे. ऑटोमॅटिक सिग्नलिंग सिस्टिमची लांबी १२.४१ किलोमीटर असून यात १ ऑटो हट, १ गेट, ५ नंबर अप रोड आणि ५ नंबर डाऊन रोडसाठी ऑटो सेक्शन तयार करण्यात आले आहेत. यात ४ सेंटिमीटर ऑटोमॅटिक तसेच ६ ऑटो सिग्नल आहेत. १० अप आणि १० डाऊन लाईनसाठी ट्रॅक सेक्शन आहेत. यात दुहेरी ऑटो रिसेटची सुविधा असून रिले हटमध्ये फ्युज अलार्म प्रणाली, फायर अलार्म आणि ईएलडी प्रदान करण्यात आली आहे. लेव्हल क्रॉसिंग १२० मध्ये थेट बुम लॉकिंग आणि क्रँक हँडल इंटरलॉकिंंगच्या सोबत आहे. याची विशेषता म्हणजे या सेक्शनमध्ये जे रेल्वेस्थानक आहे, त्यांचे नियंत्रण विभागीय नियंत्रण कार्यालयातून होईल. कोणत्याही ट्रॅक सेक्शनमध्ये अडथळा आल्यास येथे ४४ डीपी लावण्यात आले आहेत. ऑटो रिसेटिंंगच्या माध्यमातून एसएमएसची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑटो हटमध्ये विजेचा पुरवठा तसेच पॉवर उपकरण लावण्यात आले आहेत. ऑटो रिले हटच्या दारावर डाटा लॉगरच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येणार आहे. यात डागा लॉगरने मोफत एलईडी आणि फ्यूज अलार्मची माहिती मिळणार आहे.