Nagpur: उद्यापासून विदर्भात मुसळधारचा येलाे अलर्ट, १५ दिवसांची प्रतीक्षा संपणार?
By निशांत वानखेडे | Published: August 16, 2023 08:43 PM2023-08-16T20:43:39+5:302023-08-16T20:44:18+5:30
Nagpur: विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या दाेन आठवड्यापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ही चिंता मिटण्याचा दिलासादायक अंदाज हवामान विभागाकडून आला आहे.
नागपूर - विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या दाेन आठवड्यापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ही चिंता मिटण्याचा दिलासादायक अंदाज हवामान विभागाकडून आला आहे. १८ ऑगस्टपासून नागपूरसह विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता असून वेधशाळेने येलाे अलर्ट जारी केला आहे.
खनून आणि लान वादळांचा प्रभाव ओसरल्यानंतर बंगालच्या उपसागरात सायक्लाेनिक सर्क्युलेशन तयार झाले आहे व ते दक्षिणेकडे वळत आहे. शिवाय उत्तरप्रदेश व आसपासच्या क्षेत्रात सायक्लाेनिक सर्क्युलेशनसह दक्षिण कर्नाटकमध्ये झंझावात तयार हाेत आहे. या प्रभावाने विदर्भात १८ ते २१ ऑगस्टदरम्यान काही ठिकाणी जाेरदार ते अतिजाेरदार पावसाचा अंदाज वेधशाळेने दिला आहे. त्यानंतरही पावसाळी ढग कायम राहणार असण्याची शक्यता आहे. मात्र ही दिलासादायक स्थिती केवळ विदर्भातच राहणार आहे. मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात या काळात ढगाळ वातावरण व विजगर्जनांसह तुरळक पाऊस हाेईल, असा अंदाज आहे.
दरम्यान, वातावरणीय बदलामुळे बुधवारी नागपूरसह काही जिल्ह्यात उनसावल्यांचा खेळ चालला हाेता. सकाळी उन तापल्यानंतर दुपारपासून आकाश ढगांनी व्यापले हाेते. नागपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. पारशिवनी, कुही, उमरेड, भिवापूर तालुक्यात पावसाने हजेरी लावली. नागपूर शहरात मात्र ढगांचा लाभ झाला नाही. १२ दिवसांपासून पाऊस न झाल्याने पावसाची सरासरी माेठ्या फरकाने घटली आहे. अकाेला व अमरावतीत ती धाेकादायक स्थितीत पाेहचली आहे. उर्वरित जिल्ह्यात स्थिती सामान्य असली तरी त्यात घट झाली आहे.
काेणत्या जिल्ह्यात किती पाऊस?
जिल्हा झालेला पाऊस सामान्य पाऊस फरक
नागपूर ५७२.८ ६५०.३ ११ टक्के घट
भंडारा ७०६.९ ७२५ ५ टक्के घट
गाेंदिया ६९०.३ ७९०.६ १७ टक्के घट
चंद्रपूर ६९०.९ ७६० ९ टक्के घट
गडचिराेली ८१९.८ ७७० ९ टक्के घट
वर्धा ४८९.१ ५९०.५ १८ टक्के घट
यवतमाळ ६०४.६ ५६० ७ टक्के अधिक
अकाेला ३५२.३ ५०२ २८ टक्के घट
अमरावती ३९० ५५०.७ ३० टक्के घट