नागपूर आकाशवाणीचे 'अ' श्रेणी सतारवादक नासिर खान यांचे निधन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 12:00 PM2021-03-17T12:00:54+5:302021-03-17T12:01:39+5:30

Nagpur News नागपूर आकाशवाणीचे 'अ' श्रेणी कलाकार व प्रसिद्ध सतारवादक नासिर खान यांचे आज कोरोना संक्रमानामुळे निधन झाले.

Nagpur All India Radio's 'A' category satar player Nasir Khan has passed away | नागपूर आकाशवाणीचे 'अ' श्रेणी सतारवादक नासिर खान यांचे निधन 

नागपूर आकाशवाणीचे 'अ' श्रेणी सतारवादक नासिर खान यांचे निधन 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर आकाशवाणीचे 'अ' श्रेणी कलाकार व प्रसिद्ध सतारवादक नासिर खान यांचे आज कोरोना संक्रमानामुळे निधन झाले. ते ५२ वर्षाचे होते. पाच वर्षाचे असतानाच नासिर खान यांनी सैनी घराण्याचे पं. अरुण कुमार भट्टाचार्य यांच्याकडून सतार शिकण्यास सुरुवात केली. सोबतच वडील प्रसिद्ध सारंगी वादक उस्ताद हमीद खान यांच्याकडूनही त्यांना मार्गदर्शन होत होते. ग्वाल्हेर चे सारंगी वादक उस्ताद सरदार खान आणि पुणे येथील सारंगी वादक उस्ताद लतीफ अहमद खान यांच्याकडूनही नासिर खान यांनी संगीताचे धडे गिरवले. १९८८ पासून नासिर खान नागपूर आकाशवाणीला कार्यरत आहेत. त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सादरीकरण केले असून, आपल्या सतारवादानाच्या मधुर स्वरांनी रसिकांना घायाळ केले आहे. गेले काही दिवस त्यांच्यावर खाजगी इस्पितळात कोरोना संक्रमानामुळे उपचार सुरू होते.

Web Title: Nagpur All India Radio's 'A' category satar player Nasir Khan has passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू