झाशी विभागात होणाऱ्या इंटरलॉकिंगमुळे नागपूर अमृतसर प्रभावित
By नरेश डोंगरे | Published: December 5, 2023 07:14 PM2023-12-05T19:14:20+5:302023-12-05T19:14:30+5:30
उत्तर मध्य रेल्वेच्या झाशी विभागात विरांगणा लक्ष्मीबाई झांसी - दुरोंधा स्थानकावरील थर्ड लाईन जोडण्यासाठी नॉन इंटरलॉकिंग आणि यार्ड रिमॉडेलिंगचे काम हाती घेण्यात आले आहे.
नागपूर : झांशीच्या रेल्वे विभागात सुरू असलेल्या इंटरलॉकिंग वर्कमुळे या मार्गाने धावणाऱ्या अनेक गाड्यांना फटका बसला आहे. त्या मार्गावरच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यात नागपूर - अमृतसर - नागपूर या दोन गाड्यांचाही समावेश आहे.
उत्तर मध्य रेल्वेच्या झाशी विभागात विरांगणा लक्ष्मीबाई झांसी - दुरोंधा स्थानकावरील थर्ड लाईन जोडण्यासाठी नॉन इंटरलॉकिंग आणि यार्ड रिमॉडेलिंगचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचा फटका या मार्गाने धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांना बसला आहे. काही गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात १६ डिसेंबरला धावणारी गाडी क्रमांक २२१२५ नागपूर अमृतसर एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक २२१२६ अमृतसर नागपूर एक्सप्रेस १८ डिसेंबरला रद्द करण्यात आली आहे.
प्रवाशांना चांगली सुविधा देण्यासाठी हे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या गाड्या रद्द करण्यात आल्या असून, त्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.