नागपुरातील अपार्टमेंटचे पार्किंग बनले आंबटशौकिनांचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 10:37 PM2019-06-19T22:37:03+5:302019-06-19T22:39:30+5:30

सदर येथील एक चर्चित अपार्टमेंटचे पार्किंग सध्या आंबटशौकिनांचा अड्डा बनले आहे. या पार्किंगचा वापर लैंगिक शोषणासाठी केला जात आहे. अपार्टमेंटच्या सीसीटीव्हीमध्येही या प्रकारचे कृत्य कैद झाले आहे. पोलीस आयुक्तालयापासून मोजक्याच अंतरावर असे कृत्य चालत असल्याने परिसरातील नागरिकही चिंतेत पडले आहे.

In Nagpur an apartment become a den for sex abuse | नागपुरातील अपार्टमेंटचे पार्किंग बनले आंबटशौकिनांचा अड्डा

नागपुरातील अपार्टमेंटचे पार्किंग बनले आंबटशौकिनांचा अड्डा

Next
ठळक मुद्देरात्रीला होते लैंगिक शौषण : सीसीटीव्हीमध्ये कैद झाले कृत्य

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सदर येथील एक चर्चित अपार्टमेंटचे पार्किंग सध्या आंबटशौकिनांचा अड्डा बनले आहे. या पार्किंगचा वापर लैंगिक शोषणासाठी केला जात आहे. अपार्टमेंटच्या सीसीटीव्हीमध्येही या प्रकारचे कृत्य कैद झाले आहे. पोलीस आयुक्तालयापासून मोजक्याच अंतरावर असे कृत्य चालत असल्याने परिसरातील नागरिकही चिंतेत पडले आहे.
सदर पोलीस ठाणे हद्दीत काटोल रोडवर छावणीकडे जाणाऱ्या चौकात ही इमारत आहे. अपार्टमेंटमध्ये कार्यालय आणि दुकाने आहेत. अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये पार्किंग आहे. रात्री कार्यालय आणि दुकाने बंद झाल्यानंतर बेसमेंटमध्ये कुणीच फिरकत नाही. तेव्हा येथे गैरकृत्ये सुरू होतात. विकृत मानसिकतेने ग्रस्त लोक येथे येतात. ते बेसमेंटमध्येच गैरकृत्य करीत असतात. रात्री ११ वाजेपासून तर पहाटेपर्यंत अशा लोकांची येथे ये-जा असते. अलीकडे एका कार्यालयाच्या कर्मचाऱ्याला येथे संदिग्ध लोक दिसल्याने संशय आला. त्याने सीसीेटीव्ही फुटेज तपासून पाहिले तेव्हा खरा प्रकार उघडकीस आला. तिथे दोन तरुण आपत्तीजनक अवस्थेत आढळून आले. अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये अनेक दिवसांपासून हे प्रकार सुरू आहेत. परिसरात सीसीटीव्ही लागले असल्याची येथे येणाऱ्या लोकांनाही माहिती आहे. ते सीसीटीव्हीपासून स्वत:ला वाचवून असतात. परंतु दोन युवक सीसीटीव्हीमध्ये सापडल्याने हा प्रकार उघडकीस आला.
या इमारतीच्या जवळच उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. या कामात मोठ्या मशीनचा वापर केला जात आहे. या कामाशी संबंधित तंत्रज्ञाची अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये नियमित ये-जा आहे. तो आपल्या हाताखाली काम करणारे मजूर आणि अल्पवयीन मुलांना पैशाचे आमिष दाखवून येथे आणतो. त्यांच्याशी बळजबरी करतो. अपार्टमेंटमधील अनेक लोकांना याबाबत माहितीही आहे. काही लोकांनी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही तक्रार केली आहे. परंतु तो तंत्रज्ञ असल्यामुळे कुठलीही कारवाई झाली नाही. या अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये ज्या प्रकारे गैरकृत्य सुरु आहेत त्यामुळे भविष्यात एखादी मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
असामाजिक तत्त्वांचाही वावर
अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये असामाजिक तत्त्वांचाही वावर असतो. ते नशेचे सेवन करतात. येथे पूर्वी हुक्का पार्लरही चालत होते. हुक्का पार्लर चालवणारा किक्रेट सट्ट्याशीही संबंधित होता. हुक्का पार्लर बंद पडले तरी नशा करणारे युवक येथे येतात. त्यांना येथे एमडी आणि दुसरे इतर नशेचे साहित्य सहज मिळते. एनडीपीएस सेललाही याचा माहिती आहे. परंतु अद्याप कारवाई झालेली नाही.
सेक्स रॅकेटचेही तार
सदर आणि राजनगर परिसरात अशा विकृत लोकांची कमतरता नाही. राजनगरातच युवकांचा एक समूह राहतो, तो लैेगिक संबंधांसाठी मुलांचा पुरवठा करतात. सोबतच हायप्रोफाईल सेक्स रॅकेटही चालवतात. या समूहाचा सूत्रधार इव्हेंट मॅनेजमेंटच्या नावाने काम करतो. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर तरुण-तरुणी आहेत. त्यांना शहरातील पब व हॉटेलमध्ये नेहमीच पाहिले जाते. शनिवारी व रविवारी तो स्वत:च आयोजन करतो. यामध्ये मोजक्याच लोकांना प्रवेश दिला जातो.

 

Web Title: In Nagpur an apartment become a den for sex abuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.