नागपूर अधिवेशनाचा फटका; कर्मचारी वसतिगृहात आणि विद्यार्थी वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 10:09 AM2018-07-02T10:09:13+5:302018-07-02T10:09:45+5:30

Nagpur assembly session; Staff Hostel and student wind | नागपूर अधिवेशनाचा फटका; कर्मचारी वसतिगृहात आणि विद्यार्थी वाऱ्यावर

नागपूर अधिवेशनाचा फटका; कर्मचारी वसतिगृहात आणि विद्यार्थी वाऱ्यावर

Next
ठळक मुद्देचोखामेळा वसतिगृहातील विद्यार्थी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधिमंडळ अधिवेशनासाठी नागपुरात आलेल्या पोलीस व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी चक्क वसतिगृहातील विद्यार्थ्यांना इतरत्र हलविण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. ऐन पावसाळ्यात विद्यार्थ्यांना इतरत्र हलविण्यात आल्याने त्यांची गैरसोय होत आहे. शिष्यवृत्ती आणि जात वैधता प्रमाणपत्रामुळे आधीच विद्यार्थी त्रस्त असून, यामुळे विद्यार्थांमध्ये रोष पसरला आहे.
गेल्या चार दशकात पहिल्यांदाच पावसाळी अधिवेशन नागपुरात होत आहे. यासाठी १० हजारांवर अधिकारी, कर्मचारी दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी पोलीस कर्मचाऱ्यांनी कळमना मार्केट, शासकीय समाजभवन हॉलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. विधानभवनापासून काही स्थळ लांब असल्याने ते वगळण्यात आल्याचे समजते. विधिमंडळ अधिवेशनासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची सोय शासकीय वसतिगृहात करण्यात येत आहे. चोखामेळा वसतिगृहातील खोल्या पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना वसतिगृहच खाली करण्यात सांगितले आहे. काही विद्यार्थ्यांनी वसतिगृह सोडल्याची माहिती आहे. चोखामेळा वसतिगृहात दीडशेवर मुलांच्या राहण्याची सोय आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पावसाळा असल्याने स्थानिक प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या राहण्यासाठी वसतिगृहाची मागणी केली होती. विद्यार्थ्यांना हलविण्यास त्यांची गैरसोय होईल, असे म्हणत समाजकल्याण विभागाने विरोध दर्शविला. ाात्र प्रशासनाने वसतिगृह देण्याचे आदेश काढल्याची माहिती आहे. विदर्भातील शेतकरी, विद्यार्थी, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी विधिमंडळाचे एक अधिवेशन नागपुरात घेण्यात येते. मात्र हे अधिवेशनच विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र आहे.

चोखामेळा वसतिगृह पाडून त्या जागी नवीन वसतिगृहाची इमारत बांधण्यात येणार आहे. याचे कार्य महाविद्यालये सुरू होण्यापूर्वीच सुरू करण्यात येणार असल्यामुळे विद्यार्थ्यांची व्यवस्था इतरत्र करण्यात येत आहे. त्यामुळे वसतिगृहात यंदा नवीन विद्यार्थ्यांना ठेवण्यात आले नाही. जुन्या विद्यार्थ्यांनाही दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करणे सुरू आहे. यातच अधिवेशनापर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांच्या राहण्यासाठी वसतिगृह द्यावे, त्यानंतर इमारतीचे काम सुरू करावे, अशी विनंती प्रशासनातर्फे करण्यात आली. अधिवेशनामुळे विद्यार्थ्यांना इतरत्र हलविण्यात आलेले नाही.
- विजय वाकुळकर,
समाजकल्याण अधिकारी

Web Title: Nagpur assembly session; Staff Hostel and student wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.